मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघात बाबत शंका व्यक्त करत हा अपघात नसून घातपात झाला असावा, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एजन्सीकडून याप्रकरणी चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या अपघातामागे काही बडे नेते, नियोजित कारस्थान तसेच संशयास्पद कंपनी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
यापूर्वी अपघातावर अनेक नेत्यांनी शंका उपस्थित केल्या होत्या. आज आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत अनेक मुद्दे मांडले.
अजितदादा पवार यांचे 28 जानेवारीला बारातमीजवळ विमान अपघातात निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली होती. आज अजित पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी विविध मुद्दे मांडले. अपघाताच्या दिवशी नेमकं काय घडलं याबाबत चित्रफितीच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली.
रोहित पवार म्हणाले, दादांच्या मुंबई ते बारामती प्रवास 210 किलोमीटर होता. त्याला 27 मिनिट लागणार होती. व्हिएसआर नावाच्या कंपनीचं विमान होतं. अमेरिकेत विमान तयार झालं. विमानात डाव्या बाजूला दादा बसले असावेत. दुसऱ्या सेक्शनमध्ये बॅगा होत्या. पाठी मागे. पेट्रोलच्या टाक्या आहेत. या कंपनीची लेअरजेटच्या बाबत देशात मक्तेदारी आहे. सर्वाधिक लेअरजेटची विमाने या कंपनीकडे आहेत.
अपघाता दिवशी नेमकं काय घडलं
दादांच्या अपघाताच्या दिवशी 7 वाजून 2 मिनिटाला क्रू पोहोचले. कॅप्टनने चेक केलं. बारामती एअरपोर्टला फोन केला असेल. व्हिजीबिलीटी आहे का विचारलं. 7 वाजून 10 मिनिटाने ओकेचा मेसेज आला. दादांचे पीसए विदीप जाधव आले. दादा 7.30 वाजता पोहोचले. विमानाने उड्डाण केले. 8.22 ला विमान लोणावळा. 8.25 वाजता पुण्याजवळ, 8.30 वाजता यवतला. 8.32 ला सुपेजवळ पोहोचले. त्यानंतर 8.43 ते 8.45 दरम्यान अपघात झाला. 9 वाजता दादा जखमी असल्याची बातमी आली. पण 9.45 वाजता दादा गेल्याची बातमी आली. त्यामुळे आम्ही सुन्न झालो.
विमान 16 वर्षे इतकं जुनं
रोहित पवार म्हणाले की, विमानाचं ॲप आहे. युनिव्हर्सल ॲप आहे. त्यात गेल्यावर किती वर्षापूर्वीचं विमान होतं हे कळतं. हे विमान 16 वर्षापूर्वीचं आहे. 25 आणि 26 ला हे विमान सुरतला जाऊन आलं होतं.
रोहित पवार यांनी अपघातानंतर VSR कंपनीचे मालक विजय कुमार सिंग यांची प्रतिक्रिया दाखवली. विमान चांगल्या स्थितीत होते आणि मेन्टेन्ड होते, वैमानिक अनुभवी होते. अपघात विसिब्लिटी इशूमुळे झाल्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया विजय कुमार सिंग यांनी दिली होती. पण स्थानिकांच्या प्रतिक्रिया पाहता विमान कंपनीच्या मालकाचा दावा पूर्णपणे खोटा ठरत असल्याचं रोहित पवार म्हणाले. विमानात यांत्रिक बिघाड झाल्याचे स्पष्ट होत असल्याचे रोहित पवार म्हणाले.
गावाच्या वरून विमान गेलं तेव्हा लोकांनी सांगितले की आवाज वेगळा येत होता. म्हणजे मेंटेनन्समध्ये प्रॉब्लेम असेल. विमान आलं आणि पडलं. हे सीसीटीव्ही फुटेजमधून दिसलं असंही रोहित पवार म्हणाले.
रोहित पवार यांचे आरोप आणि संशय :
नियोजित दौरा: अजितदादांचा प्रवासाचा प्लॅन कारने जाण्याचा होता, परंतु तो ऐनवेळी बदलून विमानाने जाण्याचे नियोजन कशामुळे करण्यात आले, असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला.
विमान कंपनीवर संशय: ज्या विमानाचा (व्हीएसआर व्हेंचर्स) अपघात झाला, त्या कंपनीच्या मालकावर आणि यामागील बड्या लोकांवर त्यांनी संशय व्यक्त केला आहे.
पायलट आणि सीसीटीव्ही: पायलट का बदलले? आणि अपघाताचे नेमके सीसीटीव्ही फुटेज का बाहेर येत नाही, हे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.
घातपाताचा दावा: हे एक कारस्थान (Conspiracy) असून त्या दिशेने चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, रोहित पवारांनी थेट घातपाताचा आरोप केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या