प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : नेहरूनगर येथील पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर गेल्या २५ वर्षांपासून कायमस्वरूपी तोडगा काढण्यात आलेल्या अपयशामुळे महिला मतदारांनी प्रस्थापित सत्ताधारी यांना केलेला सामुहिक विरोध व गेल्या ३० वर्षांपासून प्रत्येक निवडणूकीत फॉरेस्टच्या जमिनीवरील रहिवासी अतिक्रमणे नियमित करण्याचे आश्वासन पाळले नसल्याने येळावी गटात आमदार रोहित पाटिल यांना फटका बसल्याचे दिसत आहे. तसेच गावात विकास कामांचा उडालेला बोजवारा,बड्या धेंडयानी गावठाणातील अंतर्गत रस्त्यांवर केलेली अतिक्रमणे यामुळे मतदारांनी आमदार व स्थानिक नेतृत्वाचा दबाव झुगारुन केलेले मतदान केले.त्याचबरोबर गेल्या ४० वर्षांपासून ग्रामपंचायतीचे निष्क्रिय सत्ताधारी व निमणी येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या हुकूमशाहीला कंटाळून मतदारांनी एकत्रित येऊन लोकशाही मार्गाने हिसका दाखवला असे बोलले जात आहे.नेहरूनगर गावातील मतदार गेल्या ३५ वर्षांपासून स्व.आर आर पाटील यांच्या कुटुंबातील सदस्यांवर विश्वास ठेवून विधानसभा,लोकसभा,जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीत त्यांच्या विचारांच्या उमेदवारांना मतदान करत आले होते.गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सुमारे ४७५ ते ५०० मतांची आघाडी या गावातील मतदारांनी दिली होती मात्र काल झालेल्या मतमोजणीत पहिल्यांदाच जिल्हा परिषदेचे उमेदवार अमित उर्फ विशाल पाटील यांना ऐतिहासिक मताधिक्य मिळाले आहे.नेहरूनगरच्या मतदारांना गृहीत धरल्याचा व समस्या सोडविण्यात आलेले अपयश,निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे व आमदार रोहित पाटील यांची झालेली प्रचार सभा व त्यात पुन्हा एकदा दिलेली तीच तीच आश्वासने,वासुंबे पंचायत समितीसाठी नेहरूनगरला उमेदवारी देण्याबाबत केलेली दिशाभूल यामुळे मतदारांचा झालेला उद्रेक या सर्वांच्या एकत्रित परिणामामुळे मतदारांमध्ये पसरलेली सुप्त विरोधी लाट आमदार रोहित पाटील यांना विचार करण्याला लावणारी आहे हे निश्चित.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या