प्रतिष्ठा न्यूज
गोवा : उज्जैन येथील संत आणि हिंदू संघटना यांनी मांडलेल्या भूमिकेचे समर्थन करत मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी स्पष्ट केले की, हिंदू तीर्थक्षेत्रे ही केवळ पर्यटनाची केंद्रे नसून ती हिंदूंची पवित्र व जागृत आध्यात्मिक क्षेत्रे आहेत. ज्यांचा मूर्तीपूजेवर विश्वास नाही, हिंदू संस्कृती मानत नाही आणि जे गोमांस भक्षण करून हिंदूंच्या धार्मिक भावना पायदळी तुडवतात, अशांना मंदिरात प्रवेश हवाच कशाला? त्यांच्यावर प्रवेशबंदीच हवी, अशी भूमिका मंदिर महासंघाने मांडली.
मंदिरांचे सात्त्विक वातावरण टिकवण्यासाठी आणि पावित्र्य भंग होऊ नये, यासाठी अहिंदूंच्या मंदिर व मंदिर परिसरातील प्रवेशावर तात्काळ बंदी घालणे, ही काळाची गरज आहे. या संदर्भात फोंडा, गोवा येथील मंदिर महासंघाच्या राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेसाठी उपस्थित महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, छत्तीसगड येथील विविध मंदिरांच्या विश्वस्तांच्या उपस्थितीत एकमताने ठराव संमत करण्यात आला, अशी माहिती मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी दिली.
हिंदू मंदिरांच्या रक्षणासाठी ही नियमावली लागू झालीच पाहिजे. तीर्थक्षेत्रांच्या परिसरात पावित्र्य नष्ट करणे आणि छुप्या पद्धतीने प्रवेश करणाऱ्या विघातक प्रवृत्तींमुळे हिंदू मंदिरांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, म्हणून आम्ही ही मागणी करत आहोत, असे घनवट यांनी म्हटले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या