सावळज प्रतिनिधी: भारतासारख्या खंडप्राय देशाची ज्येष्ठ नागरिक हीच खरी संपत्ती असून केंद्र शासनाच्या अशा घोषणेच्या प्रतीक्षेत आम्ही आहोत, तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे प्रलंबित असून त्या अंतर्गत दरमहा 10000. रुपये मासिक सन्मान धन मागणीवर संघटना ठाम असल्याची माहिती अर्थक्रांती राष्ट्रीय आर्थिक साक्षरता मंच चे ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियानचे सांगली जिल्हा सचिव आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या ज्येष्ठ नागरिक सेलचे प्रदेश जनरल सेक्रेटरी गजानन पाटील यांनी दिली. राज्य शासनाने ही स्थापन केलेल्या ज्येष्ठ नागरिक आर्थिक महामंडळ आणि ज्येष्ठ नागरिकांना दरमहा 7000 रुपये देण्याच्या केलेल्या घोषणेबाबतची स्पष्टता , लाभार्थ्याच्या पात्रतेच्या नियम व अटी स्पष्ट करून त्याची तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी केली.
सावळसिद्ध ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियान संघटना, सिद्धेश्वर पतसंस्था सावळज व डॉक्टर अनिल कुलकर्णी आय हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी सिद्धेश्वर पतसंस्था, डोंगरसोनी रोड सावळज येथे मोफत डोळे व फिजिओथेरपी तपासणी शिबिर संघटनेचे अध्यक्ष मा. दिलीप भाऊ चिवटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले, त्यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री पाटील बोलत होते. यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्राचार्य शिवाजीराव पाटील, तालुका सचिव अरुण पाटील, संघटनेचे सचिव राजेंद्र .कलाल, अशोक कोरे, बापूसाहेब देसाई, दिलीप उन उणे, बाबुराव शिंदे, विठ्ठल कोरे, जगन्नाथ माळवदे इत्यादी संघटना पदाधिकारी उपस्थित होते.
खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे या साने गुरुजींच्या सर्व धर्मीय सामुदायिक प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संघटनेचे सचिव राजेंद्र कलाल यांनी अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, उपस्थित पदाधिकारी आणि हॉस्पिटल टीमचे स्वागत केले, संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. प्रमुख पाहुण्यांनी शिबिराचे उद्घाटन झाल्याचे घोषित केले आणि ज्येष्ठ नागरिकांचे जीवन आनंदी, आरोग्यमय, समृद्ध आणि चिंतामुक्त होण्यासाठी संघटनेने राज्यस्तरावरून केलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला.
. मोफत डोळे व फिजिओथेरपी तपासणी शिबिराचा सुमारे 52 लाभार्थी ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला. सावळज जिल्हा परिषद मतदार संघाचे सदस्य मा. सागर पाटील यांनी दुपारी दोन वाजता शिबिरास भेट दिली आणि लाभार्थी ज्येष्ठ नागरिकांची विचारपूस केली. सिद्धेश्वर पतसंस्थेच्या वतीने गरीब व आर्थिक दुर्बल 18 नेत्र रुग्ण ज्येष्ठ नागरिकांना नंबरचे मोफत चष्मे देण्याची घोषणा केली, याबद्दल संघटनेचे अध्यक्ष दिलीप भाऊ चिवटे यांनी सागर पाटील यांचे सावळसिद्ध ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने अभिनंदन करून आभार मानले.
शेवटी शिबिरातील उपस्थित सर्व लाभार्थी, संघटना पदाधिकारी आणि हॉस्पिटल टीम साठी नेहमीप्रमाणे मोफत नाश्ता व चहा पाण्याची व्यवस्था
सिद्धेश्वर पतसंस्थेच्या वतीने करण्यात आली. संघटनेचे सचिव राजेंद्र कलाल यांनी हॉस्पिटल टीम व उपस्थितांचे आभार मानले नंतर कार्यक्रमाची सांगता झाली, धन्यवाद.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या