प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : गगनबावडा तालुक्यातील बावेली येथील के. राहुल (राहुल दत्तात्रय कांबळे) यांनी गेल्या दहा दिवसांत महाविद्यालयीन संस्कार शिबिरे, विविध अकॅडमी तसेच स्टेज कार्यक्रमांच्या माध्यमातून तब्बल १५०० विद्यार्थ्यांचे प्रभावी समुपदेशन केले. या कार्यक्रमांतून त्यांनी विद्यार्थ्यांना अंतर्मनाची ताकद, मनाचे कार्य व यशाचा राजमार्ग प्रत्यक्ष प्रयोगांसह उलगडून दाखवला.
आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ बाह्य बुद्धिमत्तेपेक्षा अंतर्मनाची शक्ती ९० पटीने अधिक प्रभावी असल्याचे सांगत, त्या शक्तीचा योग्य उपयोग केल्यास प्रत्येकजण आपले यशस्वी जीवन घडवू शकतो, असा संदेश के. राहुल यांनी दिला. काही विद्यार्थ्यांना त्यांनी संमोहनाच्या माध्यमातून मनाचे कार्य प्रत्यक्ष प्रयोगासह समजावून सांगितले, ज्याला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गेल्या १५ वर्षांपासून संमोहन तज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेले के. राहुल हे संमोहन शास्त्राचा उपयोग करून मुलांमधील आत्मविश्वास वाढवणे, स्मरणशक्ती विकसित करणे, भीती, चिंता व नैराश्य दूर करणे यासाठी कार्यरत आहेत. शाळा व महाविद्यालयांमध्ये हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी आजवर आनंदाने संमोहन शास्त्राचे मार्गदर्शन केले आहे.
संमोहन उपचारांच्या माध्यमातून त्यांनी अनामिक भीती, चिंता, ताणतणाव, व्यसनमुक्ती, तोतरेपणा, वैवाहिक समस्या, शैक्षणिक अडचणी, निद्रानाश, चिडचिडेपणा, मोबाईलचे व्यसन अशा मानसिकतेशी निगडित अनेक समस्यांमधून गेल्या १५ वर्षांत हजारो क्लायंटना यशस्वीपणे मार्गदर्शन केले आहे. सध्या त्यांच्या दोन ठिकाणी संमोहन उपचार केंद्रे कार्यरत आहेत.
के. राहुल हे केवळ संमोहन तज्ज्ञच नव्हे तर सामाजिक कार्यकर्ते व अष्टपैलू कलाकार आहेत. चित्रकार, रांगोळीकार, वक्ता, सूत्रसंचालक, कवी, वादक, अभिनेता, पत्रकार, गीतकार, लेखक, कथाकथनकार तसेच सोंगी भजनांतून समाजप्रबोधन करणारे कलाकार अशा एकूण १७ कला ते जोपासतात. विविध संस्थांकडून त्यांच्या या बहुआयामी कार्याची दखल घेत आतापर्यंत २८ पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
विद्यार्थी, पालक व शिक्षण क्षेत्रातून के. राहुल यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या समुपदेशनातून अनेक विद्यार्थ्यांना नवीन आत्मविश्वास व सकारात्मक दिशा मिळत आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या