प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा : आगामी कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गगनबावडा तालुक्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष खा. हर्षवर्धन सपकाळ यांच्या मान्यतेने, आमदार सतेज (बंटी) पाटील, खासदार शाहू छत्रपती महाराज व आमदार जयंत आसगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही उमेदवार निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद उमेदवार :
तिसंगी (४७) मतदारसंघातून सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी अॅड. सोनाली विलास पाटील यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. तसेच असळज (४८) मतदारसंघातून सर्वसाधारण प्रवर्गासाठी संभाजी शांतराम पाटणकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
पंचायत समिती उमेदवार :
तिसंगी (६३) मतदारसंघातून अनुसूचित जाती प्रवर्गासाठी अमर केशव कांबळे,
असंडोली (६४) मतदारसंघातून सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी दिपा प्रकाश देसाई,
असळज (६५) मतदारसंघातून सर्वसाधारण प्रवर्गासाठी राजेश भगवान पाटील,
धुंदवडे (६६) मतदारसंघातून नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला उमेदवार म्हणून शुभांगी कुंडलिक सेंकापाळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
आमदार सतेज पाटील यांनी सर्व उमेदवारांचे अभिनंदन करत त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच काँग्रेस पक्षाने तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी देत सक्षम व सर्वसमावेशक उमेदवार निवडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उमेदवारांच्या मुलाखती घेऊनच ही निवड प्रक्रिया पार पडल्याची माहिती यावेळी पत्रकारांना देण्यात आली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या