प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली : डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे संचलित विलिंग्डन महाविद्यालय, सांगली (स्वायत्त, NAAC ‘A’ श्रेणी) येथील रसायनशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘केम-ओ-जॉय 2K26’ या राज्यस्तरीय रसायनशास्त्र उपक्रमाचे २३ जानेवारी २०२६ रोजी यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमात विविध महाविद्यालयांतील सुमारे २५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ वेलणकर सभागृह, विलिंग्डन महाविद्यालय, सांगली येथे पार पडला. उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उदयसिंह पाटील (Director, PATCO Industrial Suppliers, Sangli) उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रविंद्र ब्रह्मनाळकर (परिषद सदस्य डेक्कन एज्युकेशन सोसायटी) लाभले. यावेळी मा. डॉ. सचिन खेडकर ( आजिव सदस्य व संचालक सांगली बोर्ड) यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संयोजक डॉ. आर. पी. कागणे, विभागप्रमुख प्रा. डॉ. यु. एन. पोळ व महाविद्यालयाचे उपप्राचार्य व संस्थेचे आजीव सदस्य डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्राचार्य प्रो. डॉ. एस. एस. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला.
‘केम-ओ-जॉय 2K26’ अंतर्गत रसायनशास्त्र प्रश्नमंजुषा, सेमिनार, पोस्टर सादरीकरण, वैज्ञानिक रांगोळी सादरीकरण आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या संकल्पनात्मक ज्ञानासह नाविन्यपूर्ण कल्पनांचे प्रभावी सादरीकरण करून शास्त्रीय कौशल्यांचे दर्शन घडविले.
कार्यक्रमाचा समारोप समारंभ याच दिवशी सायंकाळी आयोजित करण्यात आला. समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भास्कर ताम्हनकर (माजी प्राचार्य, विलिंग्डन महाविद्यालय, सांगली) तर अध्यक्ष म्हणून डॉ. विश्राम लोमटे (परिषद सदस्य डेक्कन एज्युकेशन सोसायटी व अध्यक्ष महाविद्यालय विकास समिती, विलिंग्डन महाविद्यालय सांगली), उपप्राचार्य डॉनरसिंग पडाल उपस्थित होते. समारोपप्रसंगी स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्रशासन, रसायनशास्त्रातील प्राध्यापक सुभाष वाडकर, सिद्धेश्वर जाधव, दत्तात्रय येडगे, शरद दोडमिसे, महेश कुकडे, अमृता आवटे, दिपाली मदने, कीर्ती महानवर, शिक्षकेतर कर्मचारी, स्वयंसेवक व सहभागी विद्यार्थ्यांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या