सांगली प्रतिनिधी : गणेश उत्सवाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत विविध शासकीय योजना व सेवा सुविधा प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने “पालकमंत्री श्री गणेश उत्सव सेवा सुविधा (CSC) अभियान” राबविण्यात येत आहे. मा. ना. चंद्रकांतदादा पाटील, उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री, महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री, सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाचे नियोजन करण्यात आले आहे
सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या माध्यमातून या अभियानाची जनजागृती करण्यात येणार असून, गणेश मंडळांच्या ठिकाणी अभियानाचे सुविधा केंद्राचे स्टॉल उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांकडून आवश्यक फॉर्म व कागदपत्रे गणेश मंडळ यांच्या द्वारे संकलित करून त्यांना पालकमंत्री कार्यालय (GMO), विजय नगर, सांगली येथे आवश्यक शासकीय सेवांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या साठी जास्तीत जास्त गणेश मंडळांनी सहभाग घ्यावा व अधिक माहितीसाठी ७५८८९५४५८० क्रमांक वर संपर्क साधावा असे आवाहन पालकमंत्री कार्यालय GMO समन्वयक
केदार खाडिलकर
यांनी या प्रसिद्धी पत्रका द्वारे केले आहे.
सेवा अभियानात १२ अंकी रेशन कार्ड, आयुष्मान भारत कार्ड, आभा कार्ड, दिव्यांग नोंदणी, ई-श्रम कार्ड, PAN Card नवीन / दुरुस्ती, उद्योग आधार,ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र,शेतकरी ओळखपत्र,FSSAI लायसन्स, शॉप ॲक्ट लायसन्स तसेच महत्त्वाच्या शासकीय योजनांची माहिती जसे की, PM स्मार्ट सोलर रूफटॉप योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP), मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CMYKPY) या योजनांची माहिती देण्यात येणार आहे. गरजू नागरिकांना अर्ज शासकीय योजनांची प्रक्रिया पूर्ण करणे अथवा व आवश्यक कागदपत्रे माहिती मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
गणेश उत्सव अभियान निमित्ताने शासकीय योजनांद्वारे स्वयंरोजगार व उद्योजकतेला चालना देण्यासाठी हा विशेष सेवा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक व सांस्कृतिक उत्सव न राहता “सेवा, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीचा उत्सव” व्हावा, या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे. गणेश मंडळे, नागरिक, युवक, महिला, विद्यार्थी, छोटे व्यावसायिक, स्वयंरोजगार करू इच्छिणारे युवक तसेच गरजू लाभार्थींनी या अभियानाचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा.
पालकमंत्री कार्यालय (GMO), सांगली यांच्या माध्यमातून नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून, “शासकीय योजना नागरिकांच्या दारापर्यंत आणि नागरिकांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ” हे अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
अधिक माहितीसाठी पालकमंत्री कार्यालय (GMO), विजय नगर जिल्हाधिकारी कार्यालय समोर सांगली, येथे संपर्क साधावा.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या