बुधगाव प्रतिनिधी : येथील पद्मभूषण वसंतरावदादा अभियांत्रिकी महाविद्यालयात भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त ‘अभियंता दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . डॉ. विश्वेश्वरय्या यांच्या अभियांत्रिकी क्षेत्रातील अतुलनीय योगदानाच्या स्मरणार्थ दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय पातळीवर साजरा केला जातो.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डेव्हिड ॲडमसन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे विशाल पतंगे हे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर कार्यकारी संचालक डॉ. संतोष मोहिते , प्राचार्य डॉ. एस ए पाटील, पदविका प्राचार्य बाजीराव पाटील , निबंधक संदीप उमराणी उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे विशाल पतंगे म्हणाले " अभ्यासक्रम नाविन्यपूर्ण असला पाहिजे . विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्णता , कल्पकता अंगीकारली पाहिजे ".
यानंतर महाविद्यालयाच्या कार्यकारी संचालकांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. विश्वेश्वरय्या यांचे जीवनकार्य, त्यांची शिस्तप्रियता आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदान यावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान, समाजाभिमुख अभिनव उपाययोजना आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले. महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या नवनवीन संकल्पना याविषयी त्यांनी माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शितल गुंजाटे यांनी केले . सूत्रसंचालन संस्कृती चव्हाण हिने तर आभार प्रदर्शन डॉ. संदेश आवटी यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी खासदार विशालदादा पाटील , विश्वस्त अमितदादा पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या