प्रतिष्ठा न्यूज
बुधगाव प्रतिनिधी : पद्मभूषण वसंतरावदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (PVPIT), सांगली येथे संस्थेचा स्थापना दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. संस्थेच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून इन्स्टिटयूट इंनोव्हेशन कौन्सिल अंतर्गत इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन तसेच स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन 2026 चे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत एकूण 135 नाविन्यपूर्ण प्रस्तावांचे सादरीकरण करण्यात आले. त्या प्रस्तावांचे मूल्यमापन उद्योग जगतातले तज्ञ आणि वेगवेगळ्या विभागाच्या अनुभवी प्राध्यापकांनी केले.
इन्स्टिटयूट इंनोव्हेशन कौन्सिलच्या अधिष्ठाता डॉ. स्नेहा पाटील यांनी संस्थेच्या स्थापना दिनाचे महत्व आणि वाटचाल याविषयी माहिती दिली. नवकल्पना, उद्योजकता आणि विद्यार्थ्यांच्या कल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या इन्क्युबेशन सेंटर विषयी माहिती दिली.
कार्यकारी संचालक डॉ. एस एस मोहिते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नाविन्यपूर्ण विचार, कल्पनांचे प्रत्यक्ष प्रकल्पांमध्ये रूपांतर आणि समस्या सोडविण्याची वृत्ती विकसित करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी केवळ कल्पना मांडण्यापेक्षा त्या कल्पनांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.
प्राचार्य डॉ. एस. ए. पाटील यांनी आपल्या मनोगतात इन्क्युबेशन सेंटर आणि स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन 2026 या उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, संशोधनाला आणि नवकल्पनांना संस्थेच्या माध्यमातून योग्य दिशा देण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनच्या अंतर्गत होणाऱ्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.
पदविका विभागाचे प्राचार्य बाजीराव पाटील यांनी पीव्हीपीआयटीचे पहिले विद्यार्थी म्हणून आपल्या आठवणींना उजाळा देत संस्थेच्या विकासाचा प्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडला. संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंत झालेली प्रगती ही सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मा. विश्वस्त श्री. अमितदादा पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना इंनोव्हेशन आणि उद्योजकता यावर विशेष भर दिला. विद्यार्थ्यांनी नवीन कल्पना मांडाव्यात, आव्हानांना संधी म्हणून स्वीकारावे आणि समाजोपयोगी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेचपीव्हीपीआयटीच्या स्थापना दिनानिमित्त सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी खासदार विशालदादा पाटील , विश्वस्त अमितदादा पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले
प्राध्यापिका आसावरी मेनगुदले यांनी सूत्रसंचालन केले तर प्राध्यापिका धनश्री धोकटे यांनी आभार प्रदर्शन केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या