प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
इचलकरंजी : बुलढाणा येथे दि. १० ते १२ सप्टेंबर २०२६ रोजी होणाऱ्या ७ व्या सिनियर व सिनियर ABC राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाची बी.कॉम. भाग-२ची विद्यार्थिनी कु. स्वामिनी संदीप नातू हिची निवड झाली आहे. तसेच शिवाजी विद्यापीठांतर्गत दत्ताजीराव कदम कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, इचलकरंजी येथे झालेल्या आंतरविभागीय योगासन स्पर्धेत तिने सहावा क्रमांक पटकावला.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश कुंभार व डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य डॉ. आशिष पुराणिक यांच्या हस्ते स्वामिनी नातू हिचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
स्वामिनीला या यशासाठी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष श्री. अमित कुलकर्णी, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य श्री. नारायण आपटे व जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. शार्दुल ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. गणेश सिंहासने व श्री. दत्तात्रय मुळूक यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
स्वामिनीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, बुलढाणा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिला मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या