मिरज, : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी भाजपा महिला मोर्चा सांगली शहर जिल्हाध्यक्षा मा. स्वातीताई सुशांत खाडे यांचे विशेष सहकार्य लाभले.
लव - अंकुश अडसूळ भजनी मंडळ आणि सहकारी समडोळी यांनी पंच पदी सादर केली.
कार्यक्रमात संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या जीवनकार्यावर व्याख्यान, अभंग, भजन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा, संत ज्ञानेश्वर माऊलींचे अध्यात्मिक विचार आणि त्यांच्या कार्याचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
हा कार्यक्रम मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि संचालक श्रीराम पांडे यांच्या नियोजनातून पार पडला.
कार्यक्रमास भाजपा ज्येष्ठ नेत्या सौ. सुमनताई
खाडे, सौ. स्वातीताई सुशांत खाडे, मुख्याध्यापिका संगीता पाटील, भाजपा महिला मोर्चा मंडल अध्यक्षा सारिका राहूटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नागरिक, महिला भगिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या विचारांचा जागर, संतपरंपरेची ओळख आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याच्या दृष्टीने ‘ज्ञान माऊली’ कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या