प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : येथील वार्ड क्रमांक १२ मधील सम्राट अशोक नगर येथील नागरिकांची गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनची मागणी अखेर मार्गी लागली आहे.नगरसेवक रोहन कांबळे यांनी निवडणूक प्रचारादरम्यान दिलेला शब्द पूर्ण करत पिण्याच्या पाईपलाईनचे काम पूर्ण करून घेतले.
सम्राट अशोक नगर येथील दिनेश लोखंडे,अमोल बनसोडे,स्वराज्य माने,धेंडे सर यांच्यासह नागरिकांकडून या पाईपलाईनची मागणी सातत्याने केली जात होती. नागरिकांच्या या मागणीची दखल घेत नगरसेवक रोहन कांबळे यांनी पाठपुरावा करून काम पूर्णत्वास नेले.हे काम मा.खा.संजय काका पाटील व प्रभाकर बाबा पाटील यांच्या प्रयत्नातून तसेच नगराध्यक्ष सौ. विजयाताई बाबासाहेब पाटील,उपनगराध्यक्ष प्रसाद पैलवान,पाणीपुरवठा सभापती सौ.रोहिणीताई धोत्रे आणि गटनेते सतीश लिंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले.पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्याने सम्राट अशोक नगरमधील नागरिकांना आता पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध होणार असून,अनेक वर्षांपासूनची समस्या दूर झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या