प्रतिष्ठा न्यूज / दीपक शिंत्रे
विजयपूर : शहरातील दर्गा रिंगरोड परिसरात क्रेनच्या हुकला गळफास घेतलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. आकाश पाटील असे मृत तरुणाचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे.
आकाश पाटील हा रस्त्याच्या कामाचे कंत्राट घेतलेल्या कंपनीत काम करत होता. रोजगाराच्या निमित्ताने तो परराज्यातून विजयपूर येथे आला होता. कामाच्या ठिकाणी असलेल्या शेडमध्ये तो राहत असल्याची माहिती आहे.
दरम्यान, आकाशचा मृतदेह क्रेनच्या हुकला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेनंतर त्याच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात असून, हा आत्महत्येचा प्रकार आहे की मृत्यूमागे अन्य काही कारण आहे, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच आदर्श नगर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असून, तपासाअंती घटनेमागील वस्तुस्थिती समोर येणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या