सांगली : मदनभाऊ पाटील युवा मंच, सांगली जिल्हा यांच्या वतीने भव्य पारंपरिक होड्यांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता सांगली येथील श्री स्वामी समर्थ माई घाट, स्व. वसंतरावदादा पाटील स्मारक, गणपती मंदिरामागे येथे होणार आहे.
सांगलीच्या नदीकाठच्या पारंपरिक संस्कृतीला आणि होडी स्पर्धेच्या परंपरेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन मा. मदनभाऊ पाटील युवा मंचच्या वतीने करण्यात आले आहे. स्पर्धेत विविध होडी संघ सहभागी होणार असून नदीच्या पात्रात चुरशीच्या आणि रोमांचक होडी स्पर्धेचा थरार पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.
*स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकासाठी ₹३१,१००, द्वितीय क्रमांकासाठी ₹२१,१००, तृतीय क्रमांकासाठी ₹११,१०० तर चतुर्थ क्रमांकासाठी ₹७,१०० अशी पारितोषिके व स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहेत.* त्याचबरोबर स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सर्व होड्यांना मानधन ही देण्यात येणार आहे.
या स्पर्धेत बरोबरच होड्यांच्या शर्यतीच्या रील्स तयार करण्याच्या स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले असून यामध्येही रोख पारितोषिक व स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहे.
या पारंपरिक होडी स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी सांगली शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मा. मदनभाऊ पाटील युवा मंच, सांगली जिल्हा यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष शितल लोंढे यांनी केलेआहे.
स्थळ : श्री स्वामी समर्थ माई घाट, स्व. वसंतरावदादा पाटील स्मारक, गणपती मंदिरामागे, सांगली
दिनांक : रविवार, २० सप्टेंबर २०२६
वेळ : दुपारी ४.०० वाजता
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या