प्रतिष्ठा न्यूज / किरण कुंभार
तासगाव : तासगाव पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी सुमारे ४ लाख ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.तपासादरम्यान हस्तगत करण्यात आलेले १२७.१८ ग्रॅम सोन्याचे दागिने न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित फिर्यादीला परत करण्यात आले आहेत.तासगाव पोलिसांच्या या कारवाईमुळे तपास पथकाचे कौतुक होत आहे.तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३४०/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३), ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील फिर्यादी मूर्ती गोविंदराव पाटील (वय ३६, रा. शिरगाव, ता. तासगाव, जि. सांगली) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली.
### वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास
सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी तपास पथकाची नियुक्ती केली.
या पथकात सपोनि दीपक पाटील,पोहेकॉ अमर सूर्यवंशी, पोहेकॉ सुरेश भोसले,पोशी विवेक यादव,पोशी सुरज जगदाळे, पोशी निलेश डांगे, पोशी संतोष माळी, पोशी योगेश जाधव, पोशी शहाजी भोसले, पोशी सागर पाटील यांचा समावेश होता.पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करत संशयित आरोपीकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत केले. यामध्ये सोन्याचे नेकलेस, बांगड्या, कर्णफुले, मंगळसूत्र, बोऱमाळ, गळ्यातील दागिना आणि अंगठी अशा विविध दागिन्यांचा समावेश आहे.या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत ४ लाख ८० हजार रुपये आहे.
### न्यायालयाच्या आदेशाने दागिने फिर्यादीला परत
तपास पथकाने गुन्हा उघडकीस आणून आरोपीकडून १२७.१८ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केले. त्यानंतर मा. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी, तासगाव यांच्या आदेशानुसार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी किरण अवचर यांच्या हस्ते संबंधित हक्कदार फिर्यादीला दागिने परत करण्यात आले.तासगाव पोलिसांच्या तपासामुळे चोरीस गेलेला मौल्यवान मुद्देमाल परत मिळाल्याने फिर्यादीला दिलासा मिळाला आहे.या कारवाईत सहभागी अधिकारी आणि अंमलदारांचे कौतुक होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या