सांगली प्रतिनिधी : अजिंक्यन वुमन फाउंडेशन व विविध सामाजिक संस्थांच्या वतीने येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रक्षाबंधनाचा सण अत्यंत उत्साहात आणि भावूक वातावरणात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमादरम्यान अजिंक्यन वुमन फाउंडेशन आणि सहयोगी संस्थांच्या महिला पदाधिकाऱ्यांनी रात्रंदिवस सेवा बजावणाऱ्या कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे कौतुक करत त्यांना राखी बांधली. तसेच कारागृहातील बंदीजनांना (कैद्यांना) देखील राखी बांधून त्यांच्या मनात सकारात्मक विचार रुजावेत, समाजप्रवाहाशी पुन्हा जोडले जावे आणि त्यांच्या जीवनात सुधारणा व्हावी, या उद्देशाने त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
अजिंक्यन वुमन फाउंडेशनच्या अध्यक्षा मंजिरी गाडगीळ, शुभांगी साळुंखे, ज्योती सर्वदे, चित्रा पंडीयान, स्मिता घेवारे, स्वाती भिडे, वैशाली कुलकर्णी, अपर्णा पोतदार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तसेच कारागृह अधीक्षक विजय कांबळे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी अरुण मदने आणि कारागृहाचा सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते
सामाजिक बांधिलकी आणि आपुलकी जपणारा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगत, यावेळी कारागृह प्रशासनाच्या वतीने कारागृह अधीक्षक विजय कांबळे यांनी अजिंक्यन वुमन फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व उपस्थित महिलांचे मनःपूर्वक आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या