सांगली, प्रतिनिधी : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांचे मान्यताप्राप्त श्रीमती पुतळाबेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशन, सांगली या अभ्यासकेंद्रामध्ये सन 2026-2027 या शैक्षणिक वर्षासाठी सहा महिन्याचे प्रमाणपत्र,पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे.
विद्यापीठातील किंवा महाविद्यालयातील नियमीत शिक्षण सुरू असताना विद्यार्थी मुक्त विद्यापीठात प्रवेश घेऊ शकतात. नियमानुसार एकाच शैक्षणिक वर्षात दुहेरी पदवी (Dual Degree) मिळविण्याची संधी उपलब्ध आहे. मुक्त विद्यापीठात प्रवेशासाठी वयाची कोणतीही अट नाही. दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पदवी अभ्यासक्रम उपलब्ध असून उच्च शिक्षणाची संधी मिळणार आहे. कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणशास्त्र पदव्युत्तर (M.A.) तसेच D.S.M.या अभ्यासक्रमांची सुविधाही उपलब्ध आहे.याशिवाय अंगणवाडी व बालवाडीमध्ये कार्यरत सेविका तसेच इच्छुकांसाठी बालसंगोपन व रंजन शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध करण्यात आला आहे.
शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी तसेच व्यावसायिक प्रगतीसाठी इच्छुक विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांनी लवकरात लवकर श्रीमती पुतळाबेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशन,राजवाडा सांगली या अभ्यासकेंद्रात संपर्क साधून प्रवेश निश्चित करावा असे आवाहन अभ्यासकेंद्राद्वारे केले आहे.
संपर्कासाठी मोबा.नंबर
डॉ. दयानंद बोंदर 9423326205
श्री.प्रथमेश कुलकर्णी 9561378799
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या