प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
कडेपूर: श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज, कडेपूर येथे ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावर्षीच्या “Yoga for Healthy Ageing – निरोगी वृद्धत्वासाठी योग” या संकल्पनेनुसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पी. जी. यादव यांनी योगाचे महत्त्व, आरोग्यदायी जीवनशैली आणि नियमित योगाभ्यासाचे फायदे याविषयी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यनमस्कार, प्राणायाम तसेच विविध योगासनांचे प्रात्यक्षिक व सामूहिक सादरीकरण करण्यात आले.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक नवनाथ शेरखाने, पी. जी. यादव, टी. एस. जौंजळ, व्ही. जे. देशमुख, एस. बी. जाधव, ए. यू. यादव, प्रा. सौ. मयुरी सुनील देशपांडे व प्रा. व्ही. व्ही. खैरे उपस्थित होते.
योगाचे महत्त्व अधोरेखित करताना यादव यांनी नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य आणि एकाग्रता वाढण्यास मदत होत असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करून निरोगी व सकारात्मक जीवनशैली अंगीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या