सांगली, ता.२१ : येथील गुजराती सेवा समाज संचालित श्रीमती चंपाबेन बालचंद शाह महिला महाविद्यालया मध्ये "जागतिक योग दिन" मोठ्या उत्साहात संपन्न झाला. योगाचार्य अमेय पाटील- सांगली यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले आणि मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर होते.
स्वागत प्रास्ताविक मध्ये बोलताना प्राचार्य डॉ. चिकुर्डेकर म्हणाले की, "भारतीय प्राचीन संस्कृती मध्ये ऋषीमुनींनी योग विद्येच्या अभ्यासावरती समृद्ध भारतीय संस्कृती आणि परंपरेची निर्मिती केली आहे. योग हेच जीवन आहे आजच्या धावपळीच्या जीवनात किमान अर्धा तास स्वतःसाठी वेळ काढून आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न करावा त्याला योगा हा एकच पर्याय आहे. योगा करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा खर्च लागत नाही.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष कांतीभाई वामजा, रमणिकभाई दावडा, रितेशभाई शेठ यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. महेशभाई शाह, अशोक भाई व्होरा, अरुणभाई शेठ यांनी योग प्रात्यक्षिकात प्रत्यक्ष सहभाग नोंदविला.
यावेळी राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, खेळ- क्रीडा, सांस्कृतिक विभागातील विद्यार्थ्यांनीनी आणि प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी ही सहभाग नोंदविला.
सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. अर्चना सूर्यवंशी यांनी केले.
आभार जिमखाना उपाध्यक्ष डॉ. एस एन. गायकवाड यांनी मानले.
यावेळी क्रीडा संचालक दीपक राऊत, राष्ट्रीय सेवा योजनेच्या समन्वयक डॉ. एम. पी. कांबळे, राष्ट्रीय छात्र सेनेच्या समन्वयक श्रीमती ए.एस. पाटील यांनी कार्यक्रम संयोजन केले. कार्यालयीन अधीक्षक विशाल देवके, वैभव गवळी यांनी संयोजन सहाय्य केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या