प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
मिरज : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मातोश्री तानुबाई दगडू खाडे (MTDK) शैक्षणिक संकुलात विविध योगासने, प्राणायाम व ध्यान सत्रांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थी, शिक्षक, महिला मोर्चा कार्यकर्त्या, पदाधिकारी व पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत योगाचे महत्त्व जाणून घेतले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी MTDK शैक्षणिक संकुलाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा स्वातीताई सुशांत खाडे उपस्थित होत्या. यावेळी इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका संगीता पाटील व सेमी इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका करुणा माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
आर्ट ऑफ लिव्हिंगचे योग प्रशिक्षक व माजी शिक्षणाधिकारी जयवंत खोत तसेच स्वप्नीला सातपुते यांनी विद्यार्थ्यांना योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व सांगितले. स्वयंसेवक विकास पवार, स्वाती गौड आणि राजेंद्र व्हाणमोर यांनी योग प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रमास लोकमतचे ICD प्रमुख दिगंबर सुतार, जाहिरात प्रमुख विनायक पाटील व मिरज प्रतिनिधी सदानंद औंढे यांची विशेष उपस्थिती लाभली. योग दिनानिमित्त संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण असून विद्यार्थ्यांनी नियमित योग करण्याचा संकल्प केला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या