सांगली: सांगली पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षाने 20 जून 2026 रोजी सकाळी 8 वाजता जाहीर केलेल्या अहवालानुसार, जिल्ह्यातील प्रमुख नद्या आणि बंधाऱ्यांवरील पाणीपातळी सध्या धोक्याच्या पातळीपेक्षा खूपच कमी असून पूरस्थितीचा कोणताही धोका नाही.
कृष्णा नदीवरील कराड, बहे, ताकारी व मिरजवडी पूल तसेच आयर्विन पूल, राजापूर व राजाराम बंधाऱ्यांवरील पाणीपातळी सुरक्षित मर्यादेत आहे. दरम्यान, कोयना धरणात 13.12 टीएमसी, वारणा धरणात 11.28 टीएमसी तर अलमट्टी धरणात 29.709 टीएमसी पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे.
धरणांतून नियंत्रित स्वरूपात विसर्ग सुरू असून कोयना धरणातून 525 क्युसेक्स, वारणा धरणातून 200 क्युसेक्स आणि अलमट्टी धरणातून 856 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाने नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या