कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापूर येथे दिनांक 7 जून रोजी हिंदू एकता आंदोलन संघटना कोल्हापूर जिल्हा कार्यालयाच्या हॉलमध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील हिंदू एकता आंदोलन संघटना जिल्हाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, शहर अध्यक्ष यांची बैठक हिंदू एकता आंदोलन संघटनेचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे व हिंदू आंदोलन संघटना प्रदेश कार्याध्यक्ष विनायक आण्णा पावसकर यांच्या उपस्थितीत पार पडली.
या बैठकीमध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून 11 पदाधिकाऱ्यांची कोअर कमिटी सदस्य म्हणून निवड करण्यात आली. या बैठकीमध्ये हिंदू एकता आंदोलन महिला आघाडी व हिंदू एकता आंदोलन युवा आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर हिंदू एकता आंदोलन संघटना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व हिंदू एकता आंदोलन संघटना महाराष्ट्र प्रवक्ता नव्याने नियुक्त करण्याचे ठरले.
यावेळी बोलताना *हिंदू एकता आंदोलन संघटनेचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे* म्हणाले की, राज्यातल्या सरकारनं महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन कायद्याचा प्रारूप प्रस्ताव आणला होता त्याला सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील हिंदू एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी हा कायदा हिंदूंची देवस्थान उध्वस्त करणारा आहे म्हणून या कायद्याला हिंदू एकता आंदोलन संघटनेने विरोध केला होता. या कायद्यामध्ये वक्फ बोर्डाच्या जमिनी, दर्गाहाच्या जमिनी, चर्चच्या जमिनी या कायद्यातून वगळण्यात आलेल्या आहेत म्हणून हिंदू एकता आंदोलन संघटनेने विरोध केला होता. या आंदोलनाची दाखल घेऊन सरकारने तो कायदा स्थगित करण्याचा निर्णय घेतला हे हिंदू एकता आंदोलनाचे यश आहे. हिंदू एकता आंदोलनाच्या सभासदाला धर्म रक्षक म्हणून नोंदणी करून ओळखपत्र देण्यात येईल अशी माहिती नितीन शिंदे यांनी दिली.
यावेळी हिंदू एकता आंदोलन संघटनेचे कार्याध्यक्ष विनायक आण्णा पावसकर* म्हणाले की, हिंदू एकता आंदोलन महिला आघाडी संघटनेची बांधणी करत असताना पहिला आपापल्या घरातील महिलांना संघटनेमध्ये सक्रिय करा. जुन्या व नव्या कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा आयोजित करा. महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन कायदा हा कायदा हिंदू विरोधी आहे हे सर्वप्रथम निदर्शनास आणून देणाऱ्या हिंदू एकता आंदोलन कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई यांचा सत्कार हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ नेते दत्ता भोकरे, चंद्रकांत जिरंगे, गजानन तोडकर आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रदेश कार्यकारणीचे संपूर्ण नियोजन हिंदू एकता आंदोलनाचे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई यांनी केले. या बैठकीत संघटनेच्या दृष्टिकोनातून अनेक संघटनात्मक ठराव करण्यात आले. या बैठकीस भारतीय जनता पार्टीचे कराडचे नगरसेवक अजय पावसकर यांची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून तर सांगली शहर अध्यक्ष म्हणून अनिरुद्ध कुंभार यांची निवड करण्यात आली.
यावेळी या बैठकीला हिंदुराव शेळके, संजय जाधव, दिग्विजय शिंदे, हरप्रीतसिंग गौर, गजानन माने, सोमनाथ गोटखिंडे, सुरेश इंगळे, प्रतीक डिसले, राहुल यादव, विजय टोने, विष्णुपंत पाटील, विलास मोहिते यांच्यासह हिंदू एकता आंदोलनाचे सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या