प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : १९९६ साली स्थापन झालेल्या MSPD Summer Camp ने यंदा आपल्या ३० वर्षांच्या यशस्वी आणि प्रेरणादायी प्रवासाची नोंद केली आहे. सुरुवातीला महाराष्ट्रापुरती मर्यादित असलेली या शिबिराची व्याप्ती आज देशातील विविध राज्यांपर्यंत विस्तारली असून महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, गुजरात, राजस्थान आणि केरळ येथील सुमारे ४०० विद्यार्थी या २१ दिवसीय निवासी उन्हाळी शिबिरात सहभागी झाले आहेत.
या भव्य शिबिराची सांगता उद्या, दिनांक २१ मे २०२६ रोजी विविध प्रात्यक्षिके आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी होणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणाऱ्या या Demo Day मध्ये सकाळच्या सत्रात विविध क्रीडा प्रात्यक्षिके, तर दुपारच्या सत्रात संस्कृती आणि कला सादरीकरणाचा रंगतदार कार्यक्रम होणार आहे.
या विशेष प्रात्यक्षिक दिनासाठी सर्व नागरिक, पालक आणि क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन Barrister G. D. Patil Gymkhana व MSPD Summer Camp चे कार्याध्यक्ष श्री. गौतम पाटील यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या