गगनबावडा : पेट्रोल आणि डिझेलच्या सातत्याने वाढणाऱ्या दरांनी सामान्य जनता, कष्टकरी आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. केंद्र सरकारच्या या अन्यायकारक महागाईविरोधात आणि जनविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी गगनबावडा तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने उद्या, गुरुवार, २१ मे २०२६ रोजी सायंकाळी ४:०० वाजता गगनबावडा बसस्थानक समोरील पेट्रोल पंपावर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्याचे लाडके खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज (बंटी) पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व १२ तालुक्यांमध्ये एकाच वेळी हे आंदोलन होत असून, गगनबावडा तालुका काँग्रेसनेही यासाठी कंबर कसली आहे.
आंदोलनाची रूपरेषा :
एकत्र येण्याचे ठिकाण: गगनबावडा मुख्य चौक
आंदोलनाचे स्थळ: गगनबावडा एसटी स्टँड समोरील पेट्रोल पंप
दिनांक व वेळ: गुरुवार, २१ मे २०२६, सायंकाळी ४:०० ते ७:०० वाजता
"सतत वाढणाऱ्या इंधन दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे. केंद्र सरकारच्या या दडपशाही आणि महागाई विरोधात आता रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची वेळ आली आहे."
— श्री. बजरंग ज्ञानदेव पाटील (तालुकाध्यक्ष, गगनबावडा तालुका राष्ट्रीय काँग्रेस)
कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
या आंदोलनाची व्याप्ती वाढवण्यासाठी गगनबावडा तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आजी-माजी सदस्य, आजी-माजी सरपंच, आणि सर्व सेलच्या आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गगनबावडा मुख्य चौकात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष श्री. बजरंग ज्ञानदेव पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे. महागाईच्या या लढ्यात जनतेनेही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या