सांगली प्रतिनिधी : सोमवार दिनांक 25 मे रोजी मंगलमूर्ती कॉलनी कुपवाड, दत्तनगर बामनोळी, साईनाथ नगर काकानगर या ठिकाणावरील सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीतील महापालिकेच्या आरक्षित जागेवर झालेले पार्थना स्थळाचे अनाधिकृत बांधकाम महापालिकेच्या वतीने जमीनधोस्त करण्यात आले आहे.
तरी अतिक्रमण काढलेल्या जागेवर महापालिकेने आरक्षण विकसित करावे. कंपाउंड घालणे, महापालिकेच्या मालिकीचा बोर्ड लावावे जेणे करून तेथे पुन्हा प्रार्थना स्थळाचे, मदरसा, मशीद, जमियतखाना चे बेकायदेशीर अतिक्रमण होणार नाही व सदरची जागा नागरिकांच्या उपयोगाला पडेल. अशा आशयाचे निवेदन हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने आयुक्त यांना देण्यात आले.
यापूर्वी आम्ही सदर अतिक्रमण काढणे बाबत हिंदू एकता आंदोलन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी आंदोलन करून तसेच माहितीच्या अधिकाराखाली माहिती गोळा करून महापालिकेच्या निदर्शनास सदरची झालेली अतिक्रमणे, परवानगी न घेता केलेली बांधकामे, पूर पट्ट्यात केलेली बांधकामे निदर्शनास आणून दिलेले आहेत. तरी कुपवाड, बामनोळी, काकानगर या ठिकाणावरील बेकायदेशीर प्रार्थनास्थळाचे अतिक्रमण बुलडोझर लावून काढण्याचा धाडशी निर्णय घेतल्याबद्दल हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने आयुक्तांचे, उपायुक्तचे व अतिक्रमण पथकाचे अभिनंदन करण्यात आले.
*यावेळी बोलताना हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की,* आणखी काही सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेच्या हद्दीमधील भूखंडावर बेकायदेशीर मशिदीचे, दर्गाचे व मदरशांचे बेकायदेशीर बांधकामे करण्यात आलेले आहेत ते असेच धाडसी निर्णय घेऊन जमीनधोस्त करावे यासाठी आमचा पूर्ण पाठिंबा तुम्हास राहील.
यावेळी शहराध्यक्ष अनिरुद्ध कुंभार, जिल्हा उपाध्यक्ष राजू जाधव, पै. प्रदीप निकम, मनोज साळुंखे, प्रसाद रिसवडे, गजानन माने, श्रीपाद होमकर, दिग्विजय शिंदे,अनिकेत अंबरुळे, सुजित पाटील, राम काळ, रामचंद्र कोष्टी, लता पाटील, दीप पाटील, शुभम कोळी, अनुज निकम.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या