पलूस प्रतिनिधी : छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त 'स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समिती'च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘यशवंत फेस्टिव्हल पलूस २०२६’ ची सोमवारी पाचव्या दिवशी अभूतपूर्व उत्साहात आणि जनसागराच्या उपस्थितीत सांगता झाली. स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष मा. श्री. प्रदीप (आप्पा) कदम यांच्या कल्पक संकल्पनेतून साकारलेल्या या महोत्सवाला संपूर्ण सांगली जिल्ह्यासह करमाळा, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, वाळवा, शिराळा व कराड तालुक्यातील लाखो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पाच दिवसांच्या या महाकुंभाला नामवंत रील स्टार्स, चित्रपट कलाकार आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी विशेष भेटी दिल्याने महोत्सवाची उंची अधिकच वाढली.
प्रदीप (आप्पा) कदम हे राजकारण, पक्ष, जात आणि धर्म असा कोणताही भेदभाव न करता नेहमीच सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्याचीच प्रचिती या महोत्सवात आली. आप्पांनी तालुक्यातील सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांना या व्यासपीठावर एकत्र आणले, ज्याला सर्वांनी मनापासून साथ दिली. पलूसकरांसाठी मनोरंजनाचा खजिना घरबसल्या उपलब्ध करून दिल्याबद्दल, "प्रदीप आप्पाच आमचे खरे हिरो आहेत!" अशा अत्यंत भावनिक व स्वाभिमानी प्रतिक्रिया पाचव्या दिवशी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केल्या.
महोत्सवाच्या अंतिम दिवशी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय भव्य रेकॉर्डिंग डान्स स्पर्धेने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. राज्यभरातून आलेल्या नृत्य समूहांनी एकापेक्षा एक थरारक आणि आकर्षक नृत्याविष्कार सादर करून रसिकांना थक्क केले. लहान मुले व युवक-युवतींच्या जल्लोषात आणि टाळ्यांच्या कडकडाटात ही स्पर्धा पार पडली.
स्पर्धेचा अंतिम निकाल खालीलप्रमाणे:
प्रथम क्रमांक: रोव्हर डान्स ग्रुप (नवी मुंबई)
द्वितीय क्रमांक: ड्रीमर्स ग्रुप (जळगाव)
तृतीय क्रमांक: एंजल्स ग्रुप (पुणे)
उत्तेजनार्थ पारितोषिके: ओम साई ग्रुप (खेड), झिरो डिग्री क्यू, कला सार्थक ग्रुप (रत्नागिरी)
या चुरशीच्या स्पर्धेत परीक्षक म्हणून समीर माळी व महेश पवार यांनी अत्यंत चोख काम पाहिले.
या पाच दिवसांच्या महोत्सवात पलूसकरांना मनोरंजनाचा सुवर्णकाळ अनुभवता आला. यामध्ये ‘सर्किट नाना’ लाईव्ह शो, ४५ महिला कलाकारांचे ऐतिहासिक दोन अंकी नाटक ‘शिवप्रताप’, लोककला अविष्कार ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ आणि श्वेता दांडेकर व शुभम सातपुते यांच्या लाईव्ह गायन-नृत्य शोने रसिकांचे भरभरून मनोरंजन केले. तसेच फनफेअरमधील आकाश पाळणा, टोराटोरा, ड्रॅगन ट्रेन, नावडीसह विविध स्वादिष्ट फूड स्टॉल्स आणि खरेदी दालनांना नागरिकांनी मोठी पसंती दिली.
*पलूसकरांच्या प्रेमामुळेच महोत्सव यशस्वी: प्रदीप (आप्पा) कदम*
महोत्सवाचे मुख्य आयोजक प्रदीप (आप्पा) कदम यांनी या अभूतपूर्व यशाबद्दल सर्व नागरिक, व्यापारी, कलाकार, स्वयंसेवक, पत्रकार बांधव, पोलीस आणि प्रशासनाचे जाहीर आभार मानले. ते म्हणाले, "ग्रामीण भागातील माझ्या जनतेला शहराच्या धर्तीवरील आंतरराष्ट्रीय दर्जाचे मनोरंजन आणि सांस्कृतिक पर्वणी अनुभवता यावी, हाच आमचा प्रामाणिक उद्देश होता. पलूसकरांनी दिलेल्या अथांग प्रेमामुळेच सर्व विघ्नांवर मात करत हा महोत्सव ऐतिहासिकदृष्ट्या यशस्वी झाला."
सांगता सोहळ्याप्रसंगी संजयकुमार शिंदे, तुषार सूर्यवंशी, अभिजीत कौलगे, अभिजीत सावंत, अमीर पठाण, उद्योजक संपतराव फाळके, नगरसेविका प्राजक्ता पाटील, राजनंदिनी मोरकट्टी, संगीता गायकवाड, मामासाहेब पवार, सत्यविजय बँकेचे चेअरमन प्रशांत पवार, ॲड. दीपक लाड, माजी नगराध्यक्ष व गटनेते सुहास पुदाले, उद्योजक किरण निकम, वारकरी संघटनेच्या तालुकाध्यक्षा वैशाली लाड, राजेंद्र कुंभार, पुनदीच्या सरपंच पूनम पाटील, अभयसिंह पाटील, अशोक पवार, अशोक मोरे, आकाराम पाटील (माजी सरपंच, आमनापूर), पैलवान संभाजी आप्पा जाधव, नगरसेवक दिगंबर पाटील, रोहित पाटील (तालुकाध्यक्ष, श्री शिवप्रतिष्ठान), प्रशांत लेंगरे, सूर्यकांत बुचडे, शिवाजीराव देशमुख (भाजप तालुका उपाध्यक्ष), किंमत शिसाळे, दीपक पाटील आणि निवास कळसे यांच्यासह तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, कार्यकर्ते व जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.
हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी दौलतराव पाटील, संतोष कदम, राहुलदादा पाटील, सौमेद परीट, राजवर्धन कांबळे, सागर मासाळ, महेशभैया हजारे, अक्षय व्हरे, भास्कर संकपाळ तसेच इव्हेंट मॅनेजमेंट टीमचे कृष्णा ढोबळे, पंकज पाटील, नीरज तिवारी, सोनू अन्सारी, अभिराज हजारे यांनी परिश्रम घेतले. ध्वनी व्यवस्था अभय भोसले, पीके मीडियाचे प्रसाद कदम, आदिराज हजारे, सुनील तारळेकर, केतन माने आणि छायाचित्रकार महेश कुंभार यांनी आपले चोख सहकार्य दिले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या