सांगली प्रतिनिधी : सांगलीचे लोकप्रिय जिल्हाधिकारी मा.श्री अशोकजी काकडे यांची नुकतीच मुंबई येथे कृषी औद्योगिक महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी पदोन्नती वर बदली झाली. म्हणून श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान तर्फे त्यांच्या सांगली येथील निवासस्थानी त्यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.सांगली मधील शेतकर्यांच्या फळे व भाजीपाला विकण्यासाठी साठी रेल्वे उपलब्ध करून दिली तसेच ऑनलाईन विक्रीसाठी फ्लिपकार्ट वर बाजारपेठ उपलब्ध करून दिली. सांगली जिल्ह्यातील हजारो मुलींना कराटेचे प्रशिक्षण देऊन world record केले.त्याच बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सांगली जिल्ह्यातील १२ गडकोटांचे संवर्धन केले अशाप्रकारचे अविस्मरणीय कार्य त्यांनी सांगली जिल्ह्यामध्ये केले आहे. म्हणूनचसांगली मधील त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक म्हणून एक सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यातआला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या*. यावेळी,
*सांगली जिल्ह्याचा इतिहास असणाऱ्या कला,क्रिडा,सांस्कृतिक राजकीय सामाजिक कृषी या सर्व क्षेत्रातील माहिती संकलित करून स्वतः लेखन केलेले "कॉफी टेबल बूक" हे पुस्तक त्यांनी आम्हाला भेट म्हणून दिले.*
*त्याचबरोबर,सांगली मध्ये कार्यरत असताना अनेक आलेले चांगले अनुभव त्यांनी यावेळेस व्यक्त केले*.
यावेळी, आनंदराव चव्हाण तात्या, रामभाऊ जाधव,टाकळी मठाचे शिवदेव स्वामीजी, शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य विशालजी गायकवाड,मंगेशराव शहा,विनायक खेडेकर, संजयजी जोशी, प्रदीप पाटील, विक्रांत कोळी,संदीप जाधव संदीप माळी, अमित गायकवाड, भरत गोसावी, प्रताप यादव, अजिंक्य बोळाज व सर्व युवा सहकारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या