प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
मिरज : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त मिरज येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम माजी कॅबिनेट मंत्री व विद्यमान आ. डॉ. सुरेश भाऊ खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. महिलांच्या शिक्षणासाठी व समाजप्रबोधनासाठी त्यांनी केलेल्या कार्याची आठवण करून देत त्यांच्या विचारांचा आदर्श घेण्याचे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमाला भाजपा महिला मोर्चा सांगली जिल्हाध्यक्षा स्वातीताई सुशांत खाडे यांच्या नेतृत्वाखाली महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यामध्ये माजी महापौर संगीता खोत , नगरसेविका उज्वला कांबळे, नगरसेविका विद्याताई नलावडे, जि. प. सदस्य दीपाली कांबळे , ज्योती कांबळे, अपर्णा शेटे, साधना माळी , सारिका राहुटे, गंगुताई नाईक, रेखा शेजवळ, पूजा कांबळे, रुपाली अडसूळे अनुराधा कोरे आदि मान्यवर उपस्थित होत्या. कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यात आली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या