प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगावच्या मा.दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या आवारात विना परवाना धारदार शस्त्रे बाळगल्याप्रकरणी सांगली येथील सहा जणांविरुद्ध तासगाव पोलिसांनी गुन्हा (नं. १०३/२०२६) दाखल करून उल्लेखनीय कारवाई केली आहे.सांगली येथील ऋषिराज प्रवीण झोरे, हनमंत दिगंबर गायकवाड, अरमान हजरतअली कवठेकर,सैफ समीर जमादार तसेच दोन अल्पवयीन मुलांवर बीएनएस कलम १८९ (२), १८९ (४), १९० तसेच शस्त्र अधिनियम कलम ४ व २५ अन्वये सामुदायिक रित्या परवाना नसताना प्रतिबंधित क्षेत्रात घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन दिवसांपूर्वी नेहरूनगर (ता. तासगाव) येथे एका घरावर दगडफेक करून वाहनांचे नुकसान केल्याच्या प्रकरणातील आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार होते.या आरोपींच्या समर्थनार्थ काही युवक न्यायालयाच्या आवारात जमा झाले होते.त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी झडती घेतली असता त्यांच्या जवळ धारदार शस्त्रे आढळून आली.त्यानंतर पोलिसांनी तात्काळ सर्वांना ताब्यात घेऊन चौकशी केली व वरीलप्रमाणे गुन्हा दाखल केला.या कारवाईमुळे न्यायालय परिसरात संभाव्य अनुचित प्रकार टळल्याचे बोलले जात आहे.ही कारवाई तासगावचे नूतन पोलीस निरीक्षक विशाल टकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी विवेक यादव,अमर सूर्यवंशी, प्रशांत चव्हाण, सुरेश भोसले, सुरज जगदाळे व पवन जाधव यांनी केली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या