प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
सांगली : वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली यांच्या वतीने कै. प्रा. दिलीप देशपांडे यांच्या स्मरणार्थ ‘Vision 2026 Innoventa’ राज्यस्तरीय विज्ञान प्रकल्प स्पर्धा दिनांक २० व २१ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे आयोजन वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सांगली, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान सांगली, MTDK शैक्षणिक संकुल मिरज आणि मराठी विज्ञान परिषद, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
स्पर्धा दोन गटांमध्ये होणार असून लहान गट (इयत्ता ५ वी ते ७ वी) साठी स्पर्धा २० मार्च २६ रोजी तर मोठा गट (इयत्ता ८ वी ते १० वी) साठी स्पर्धा २१ मार्च २६ रोजी होणार आहे. प्रत्येक गटासाठी १५० विद्यार्थ्यांची प्रवेश मर्यादा ठेवण्यात आली आहे. स्पर्धेची वेळ सकाळी १०:०० ते सायं. ४:०० अशी राहणार आहे.
स्पर्धेत भौतिकशास्त्र उपकरण, रसायनशास्त्र प्रयोग, जीवशास्त्र उपकरण, अभियांत्रिकी उपकरण, नवीकरणीय ऊर्जा व नाविन्यपूर्ण विज्ञान उपकरणे या विषयांवर प्रकल्प सादर करता येणार आहेत. स्पर्धेसाठी माध्यम मराठी, इंग्रजी व सेमी-इंग्रजी असे राहील.
स्पर्धेत दोन्ही गटांसाठी स्वतंत्र पारितोषिके ठेवण्यात आली असून प्रथम क्रमांक ₹५०००, द्वितीय ₹३०००, तृतीय ₹२००० तसेच तीन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी ₹१००० अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. स्पर्धेसाठी ऑनलाईन नोंदणी व शुल्क भरण्यासाठी क्यूआर कोडची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी समन्वयक श्री. रोकडे (९१७५८०२४८०), श्री. नकट (८४४६१६७६८१) व श्री. कुलकर्णी (७२७६६१६३८४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या