प्रतिष्ठा न्यूज
कडेगांव प्रतिनिधी : आत्मभान जागवणारा मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने कडेपूर येथील आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये शुक्रवार दि.२७ फेब्रुवारी २०२६रोजी निमंत्रितांचे राज्यस्तरीय कवी संमेलन व कवी पांडुरंग माळी काव्यरत्न पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहेझ अशी माहिती आयोजक सदानंद माळी व प्राचार्य डॉ .लालासाहेब जाधव यांनी दिली . दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर, हुतात्मा बहुउद्देशीय अपंग कल्याणकारी संस्था ओगलेवाडी कराड, पांडुरंग माळी कला अकादमी तडसर व आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज कडेपूरच्या संयोगाने निमंत्रितांचे राज्यस्तरीय कवी संमेलन व पुरस्कारझ वितरण सोहळा" अंध कवी चंद्रकांत देशमुखे काव्य मंच "सांस्कृतिक सभागृहात सकाळी १०वाजता संपन्न होणार आहे. या सोहळ्याचे उद्घाटन हुतात्माचे संस्थापक अध्यक्ष डॉ सुनिल फडतरे, स्वागताध्यक्ष डॉ लालासाहेब जाधव, प्रमुख पाहुणे अमृतवेल मीडियाचे प्रमुख धर्मेंद्र पवार तर कवी संमेलनाध्यक्ष द. म. सा चे अध्यक्ष भीमराव धुळूबुळु हे भूषविणार आहेत. कवी पांडुरंग माळी काव्यरत्न पुरस्कारार्थी कवी सौ. प्रतिभा मगर(पुणे) कांचन मून( पुणे) अनिसा सिंकदर शेख(दौंड) सायरा बानू चौगुले( माणगांव ,रायगड) दयासागर बन्ने (सांगली) मन्सूर जमादार (भिलवडी) यांना पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. साहित्य सम्राटचे संस्थापक कवी विनोद अष्टूळ (पुणे) ,नरके फाउंडेशनचे कवी सीताराम नरके (पुणे), गझलकार बाबाजी मगदूम(पुणे) गझलकार सिराज शिकलगार(आंधळी) संदिप नाझरे(पलूस). डॉ विजया पवार (कराड) यांना निमंत्रित कवी निमंञित केले आहे .तरी मराठी साहित्यप्रेमी साहित्यिकानी या कवीसंमेलनास उपस्थित राहून काव्य संमेलनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे .
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या