सांगली प्रतिनिधी : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्रिभाजन करून कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यांसाठी स्वतंत्र बाजार समित्या स्थापन करण्याबाबतची अधिकृत अधिसूचना आज जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आली. या निर्णयामुळे सांगलीतील व्यापारी आणि शेतकऱ्यांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली असून, यासाठी सांगली चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी केलेल्या एकत्रित पाठपुराव्याला मोठे यश आले आहे.
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्रिभाजन करून कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यांसाठी स्वतंत्र बाजार समित्या स्थापन करण्याबाबतची अधिकृत अधिसूचना आज निर्गमित करण्यात आली. या ऐतिहासिक निर्णयाचे सांगलीतील व्यापारी आणि उद्योजकांनी उत्स्फूर्त स्वागत केले असून, सांगली चेंबर्स ऑफ कॉमर्स व मार्केट यार्डमधील व्यापाऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि पेढे वाटून मोठा आनंदोत्सव साजरा केला. सांगलीतील व्यापारी आणि शेतकऱ्यांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली असून, यासाठी सांगली चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी केलेल्या एकत्रित पाठपुराव्याला मोठे यश आले आहे.
सांगली बाजार समितीच्या त्रिभाजनासाठी सांगली चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्री. अमरसिंह देसाई, श्री. समीर साखरे, श्री. शरद शहा आणि आणि सर्व चेम्बर डायरेक्टर आणि सभासद पदाधिकाऱ्यांनी आमदार सुधीर दादा गाडगीळ यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिले होते. या निवेदनात त्यांनी मार्केट यार्डमधील व्यापाऱ्यांच्या समस्या, पायाभूत सुविधांचा अभाव आणि त्रिभाजनाची तातडीची गरज यावर प्रकाश टाकला होता. व्यापाऱ्यांच्या या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री श्री. बाबासाहेब पाटील आणि पणन मंत्री श्री. जयकुमार रावल यांच्याकडे तातडीने धाव घेतली.
आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी मंत्र्यांना दिलेल्या पत्रात स्पष्ट केले होते की, सांगली पेठेचे उत्पन्न ८०% असतानाही तो निधी इतरत्र खर्च होत असल्याने सांगली मार्केट यार्डातील रस्ते, ड्रेनेज आणि लाईट यांसारख्या मूलभूत गरजा प्रलंबित आहेत. त्यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री श्री. बाबासाहेब पाटील आणि पणन मंत्री श्री. जयकुमार रावल यांची समक्ष भेट घेऊन या तांत्रिक अडचणी दूर केल्या.
त्रिभाजनाचा निर्णय जाहीर होताच मार्केट यार्डमध्ये व्यापाऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि पेढे वाटून मोठा आनंदोत्सव साजरा केला. सांगली चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार गाडगीळ यांचे आभार मानताना म्हटले की, "आमदार महोदयांनी थेट मंत्रालय स्तरावर जाऊन हा प्रश्न मार्गी लावला, ही सांगलीच्या व्यापार क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे."
आज झालेल्या अधिसूचनेतील प्रमुख तरतुदी नुसार तीन स्वतंत्र संस्था सांगली (मिरज तालुक्यासाठी), कवठेमहांकाळ आणि जत अशा तीन स्वतंत्र बाजार समित्या आता कार्यान्वित झाल्या आहेत. सांगलीसाठी श्री. सुनील चव्हाण (अध्यक्ष) व श्री. विपीन मोहिते, कवठेमहांकाळसाठी श्रीमती अनुष्का देशमुख आणि जतसाठी श्री. चेतन जावीर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली आहे. तसेच आता सांगली बाजार समितीचा निधी सांगलीच्याच विकासासाठी वापरता येईल, ज्यामुळे मार्केट यार्डाचा कायापालट होईल.
*"शेतकरी आणि व्यापारी हितासाठी हा निर्णय होणे अत्यंत आवश्यक होते. यासाठी मला मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री श्री. बाबासाहेब पाटील आणि पणन मंत्री श्री. जयकुमार रावल यांचे मोलाचे सहकार्य लाभले. जत आणि कवठेमहांकाळला स्वतंत्र ओळख मिळाल्याने आता सांगली बाजार समितीचा विकास अधिक नियोजनबद्ध पद्धतीने करता येईल." आता सांगली बाजार समितीला आधुनिक बनवण्यावर आमचा भर राहील."*
- आमदार सुधीरदादा गाडगीळ, सांगली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या