मिरज : भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन सोमवार, दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. ‘माझा परिवार, भाजपा परिवार’ या संकल्पनेनुसार अनेक पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या व समर्थकांनी आपल्या घरांवर भाजपाचा भगवा ध्वज फडकावून पक्षाप्रती निष्ठा आणि सेवाभाव व्यक्त केला.
या निमित्ताने माजी कॅबिनेट मंत्री व विद्यमान आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालय, मिरज येथे सकाळी १० वाजता ध्वजवंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. यावेळी पक्षाचा भगवा ध्वज हा राष्ट्रनिष्ठा, समर्पण आणि निस्वार्थ सेवेचे प्रतीक असल्याचा संदेश देण्यात आला.
याप्रसंगी भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा स्वातीताई सुशांत खाडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, भारतीय जनता पार्टी ही सामान्य माणसाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी कार्यरत असल्याचे सांगितले. ‘राष्ट्र प्रथम’ ही विचारधारा प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
स्थापना दिनानिमित्त झालेल्या या उपक्रमामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, संघटन बळकटीसाठी हा दिवस प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यासाठी माजी कॅबिनेट मंत्री व विद्यमान आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे, जेष्ठ नेत्या सुमनताई खाडे, युवा नेते सुशांत खाडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी भाजपा सरचिटणीस बाबासाहेब आळतेकर, माजी नगरसेवक व ज्येष्ठ भाजपा नेते पांडुरंग कोरे, नगरसेविका अपर्णा शेटे, विद्या नलवडे, उज्वला कांबळे, मोहन वाटवे, गणेश माळी, चैतन्य भोकरे, अभिजीत गौराजे, जिल्हा परिषद सदस्य अश्विनी कांबळे, जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक बाळासाहेब होणमोरे, अनिता हारगे, प्राची फाटक, गायत्री सातपुते, कपिला पाटील, ज्योती मगदूम, ज्योती कांबळे, रामेश्वरी थोरात आदि मान्यवर उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या