प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज तासगाव तालुक्यातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आमदार रोहित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडली.या बैठकीला तालुक्यातील विविध गावांतील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि पक्षाचे प्रमुख नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीदरम्यान येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आपापली उमेदवारी लढविण्याची इच्छा व्यक्त केली.निवडणुकांच्या तयारीबाबत सखोल चर्चा करताना संघटन मजबूत ठेवणे,जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणे आणि पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार करण्यात आला.यावेळी कार्यकर्त्यांमध्ये दिसून आलेला जोश,आत्मविश्वास आणि संघटनात्मक बांधिलकी पाहता येणाऱ्या निवडणुकांमध्ये पक्ष निश्चितच उत्कृष्ट कामगिरी करेल, असा ठाम विश्वास यावेळी आमदार पाटील यांनी व्यक्त केला. तसेच सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करत मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आणि विकासाचा संदेश प्रभावीपणे मांडण्याचे आवाहन करण्यात आले.
ही बैठक आगामी निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून, तासगाव तालुक्यात पक्ष संघटन अधिक बळकट होईल,असा आशावाद यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या