प्रतिष्ठा न्यूज / सांगली दि. 13 : आज प्रभाग क्र. १० व १५ मध्ये भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी भव्य प्रचार रॅली काढण्यात आल्या . प्रभाग क्र. १० मध्ये भीमकट्ट्यापासून प्रारंभ होऊन प्रमुख मार्गावरून रॅली संपन्न झाली. व १५ नं. मध्ये गणेशनगर व सिव्हिल हाॅस्पिटल परिसरात रॅलीमध्ये पृथ्वीराजबाबा पाटील व भाजपाचे उमेदवार आणि कार्यकर्ते व भाजपा समर्थक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.. दोन्ही प्रभाग आज भाजपामय आणि कमळमय झाले होते.
यावेळी भाजपाचे सर्व उमेदवार भरघोस मतांनी विजयी होणार आणि महापालिकेत भाजपाची सत्ता येणार असे प्रतिपादन भाजपा नेते पृथ्वीराजबाबा पाटील यांनी आज दोन्ही प्रभागातील प्रचार रॅली दरम्यान केले.
दोन्ही प्रभागात रॅलीमध्ये पृथ्वीराजबाबा पाटील व त्यांच्या बरोबर सर्व उमेदवार मतदारांना कमळ चिन्हासमोरील बटण दाबून भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन करत होते.
पृथ्वीराजबाबा पाटील यांनी 'केंद्रात मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व राज्यात मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सत्तेवर आहे. महानगरपालिकेत भाजपाला बहुमत देऊन सत्तेवर आणा.. मा. मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केल्याप्रमाणे सांगलीच्या विकासासाठी पंचसूत्रीची प्रभावी अंमलबजावणी करणे आम्हाला सोईचे होईल. शुध्द व मुबलक पाणी पुरवठ्याची चांदोली धरणातून थेट पाईपलाईन, औद्योगिक विकास व रोजगार निर्मितीसाठी कवलापूर विमानतळ, कृष्णाकाठचा पर्यटन विकास, सांगलीच्या उपनगरांना न्याय, शामराव नगराची अतीवृष्टी व महापुराने होणारी दैन्यावस्था संपवण्यासाठी मा. मुख्यमंत्र्यांनी जागतिक बँकेच्या माध्यमातून भरघोस निधीची केलेली घोषणा, उद्योग व व्यापार वाढ, सांगलीला पूरमुक्त व स्मार्ट सीटी करणे हे सारे नागरी सुविधांचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेत भाजपाची सत्ता यायलाच पाहिजे. नागरिकांना उत्कृष्ट सुविधा देण्यात आम्ही कमी पडणार नाही 'अशी प्रतिक्रिया दिली.
गेल्या दहा दिवसांपासून ते संवाद बैठका, गृहभेटी, पदयात्रा व प्रचार फेरीतून प्रमुख नेते, उमेदवार व कार्यकर्ते यांच्या बरोबर अनेक प्रभाग पिंजून काढले आहेत. पक्षाचे उमेदवार निवडून आल्यानंतर पाच वर्षांत कोणती विकास कामे करणार याचा जाहिरनामा प्रसिद्ध केल्यानंतर महापालिका क्षेत्रातील मतदारांनी त्यांचे जोरदार स्वागत केले आहे. मतदारांनी भाजपाची विकास कामे अनुभवली आहेत. आणि भविष्यकाळात निश्चित आश्वासनपूर्ती करणार असा नागरिकांना विश्वास देण्यात भाजपा यशस्वी झाली आहे असेही पृथ्वीराजबाबा पाटील यांनी सांगितले. या प्रचार रॅलीमध्ये प्रभाग नं. १० चे उमेदवार सौ. रिध्दी म्हामूलकर, जगन्नाथ ठोकळे, गीता पवार, प्रकाश मुळके,प्रभाग नं. १५ चे उमेदवार महमद बागवान, श्वेता लोखंडे, विद्या नलवडे व हणमंतराव पवार आणि भाजपाचे प्रभागातील स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या