प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली: पक्षाकडून प्राप्त झालेल्या परिपत्रकाच्या अनुषंगाने आज सांगली शहरातील विविध प्रभागांमध्ये भाजपा महिला मोर्चातर्फे भव्य महिला रॅलींचे आयोजन करण्यात आले. या सर्व रॅलींना महिलांचा उत्स्फूर्त व अभूतपूर्व प्रतिसाद लाभला असून, भाजपा सरकारच्या महिला-केंद्रित धोरणांवर महिलांचा वाढता विश्वास अधोरेखित झाला आहे.
भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. स्वातीताई सुशांत खाडे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक ९ (जयहिंद कॉलनी, विश्रामबाग), प्रभाग क्रमांक ८ (अष्टविनायक नगर, गंगानगर, विद्यानगर), प्रभाग क्रमांक ७ (समतानगर) आणि प्रभाग क्रमांक ३ (कर्मवीर भाऊराव चौक परिसर) येथे एकाच दिवशी महिलांच्या भव्य रॅली उत्साहात पार पडल्या.
प्रभाग क्रमांक ९ मध्ये जयश्रीताई पाटील व उमेदवारांच्या प्रमुख उपस्थितीत, प्रभाग क्रमांक ८ मध्ये मंजिरीताई गाडगीळ व उमेदवार, प्रभाग क्रमांक ७ मध्ये माजी महापौर सौ. संगीता खोत, विठ्ठल तात्या खोत व उमेदवार, तर प्रभाग क्रमांक ३ मध्ये सुरेश बापू आवटी व उमेदवार यांच्या उपस्थितीत रॅलींना विशेष रंगत आली.
या सर्व रॅलीदरम्यान महिलांनी केंद्र व राज्य सरकारने महिलांसाठी राबवलेल्या योजना, महिला सुरक्षा, सक्षमीकरण आणि सन्मानाच्या मुद्द्यांवर ठाम भूमिका मांडत भाजपा पक्षावर आपला विश्वास व्यक्त केला. “महिला सशक्त – भारत समर्थ” या भावनेने महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत भाजपाच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला.
या सर्व कार्यक्रमात भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी ईशा साठ्ये, अनिता हारगे, साधना माळी, कल्पना मस्के, वांडरे ताई, अनघा कुलकर्णी, अनिता साळुंखे, शोभा गाडगीळ, अनिता हालकर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
या भव्य रॅलींमुळे संपूर्ण परिसर महिला शक्तीच्या ऊर्जेने दुमदुमून गेला असून, भाजपा महिला मोर्चाची संघटनात्मक ताकद आणि महिलांचा वाढता जनाधार स्पष्टपणे दिसून आला.


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या