प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने शिक्षण मंत्रालय भारत सरकार यांच्याद्वारे शैक्षणिक वर्ष २०२५- २६ मध्ये राबविण्यात आलेल्या वीरगाथा ५.० या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तासगाव तालुक्यातील जुळेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवी मधील कु.जान्हवी सचिन खोत या विद्यार्थीनीची राष्ट्रीयस्तरावर सुपर १०० विजेत्यांमध्ये निवड झाली आहे.शाळेसाठी व गावच्या इतिहासात मिळालेला पुरस्कार ही अभिमानास्पद गोष्ट असल्याचे बोलले जात आहे.या विद्यार्थीनीस शाळेतील मार्गदर्शक शिक्षक वृंद मुनाफ जमादार सर,सागर कोकाटे सर,सौ वासंती कोदांडे (खेराडकर ) मॅडम,आशिष परांडे सर व मुख्याध्यापक हणमंत कोळेकर सर,वीर गाथा उपक्रमाच्या जिल्हा नोडल अधिकारी सुरेखा खोत अधिव्याख्याता(DIET),सांगली यांनी मार्गदर्शन केले.
या स्पर्धेत देशभरातून १,९२,४८,००९ स्पर्धक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविलेला होता.त्यातून राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या सुपर शंभर विजेत्या विद्यार्थ्यांचा २६ जानेवारी २०२६ प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथे भारत सरकारच्या वतीने भारताचे संरक्षणमंत्री यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय वीरगाथा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.भारत सरकारच्या वीरगाथा राष्ट्रीय पुरस्कारसाठी या विद्यार्थीनीची निवड झाल्याबद्दल सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे,जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड,सांगली डायटचे प्राचार्य डॉ.विकास सलगर,डायटच्या जिल्हा नोडल अधिकारी सुरेखा खोत डायटचे सर्व अधिव्याख्याते, गटशिक्षणाधिकारी प्रदीप चव्हाण, बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी शंकर पवार ,केंद्रप्रमुख उत्कला आढाव,पंचायत समिती विषय तज्ञ,व्यवस्थापन समिती अध्यक्ष सर्व सदस्य,सर्व ग्रामस्थ,सर्व पालक,या सर्वांनी विशेष अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या