प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
मिरज : मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. स्वातीताई सुशांत खाडे यांनी पहिल्या दिवसापासूनच निर्णायक विजयासाठी चंग बांधला आहे. महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मदतीने त्यांनी प्रभावी व्यूहरचना आखली असून त्याची सातत्याने अंमलबजावणी करत भाजपला विजयाच्या उंबरठ्यावर आणले आहे.
सध्या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात महिला मोर्चा प्रचारात अग्रस्थानी असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. घराघरांत जाऊन संपर्क साधणे, मतदारांना मतदान प्रक्रिया समजावून सांगणे, महिलांसाठी विशेष बैठका घेणे अशा उपक्रमांवर स्वातीताई यांनी विशेष भर दिला आहे. त्याचा सकारात्मक परिणाम आता प्रत्यक्ष मतदारांच्या प्रतिसादातून दिसून येत असून “गोल भाजपच्या कोर्टात” जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
वरिष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातीताई यांनी ही निवडणुकीची खिंड अत्यंत प्रभावीपणे लढवली असून त्यांच्या नेतृत्वावर पक्षांतर्गत आणि महिला मतदारांमध्ये विश्वास अधिक दृढ झाला आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यात भाजप महिला मोर्चाची भूमिका निर्णायक ठरत असल्याचे स्पष्ट होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या