प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगाव नगरपालिका निवडणूक झाल्यानंतर थेट नगराध्यक्ष व २४ नगरसेवकांची निवड झाली असून आता उपनगराध्यक्षपदाची निवडणूक तसेच ३ स्विकृत नगरसेवकांची निवड उद्या होत आहे.तासगाव पालिकेवर काका गटाने निर्विवाद यश मिळवल्या नंतर आता उपनगराध्यक्षपदी नूतन नगरसेवक प्रसाद पैलवान यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.झालेल्या निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदी काका गटातील सौ. विजया पाटील यांची आणि २४ नगरसेवक निवडीवर शिक्कामोर्तब झाले होते.आता सर्वांचेच लक्ष उपनगराध्यक्षपदी व स्विकृत नगरसेवकपदी कोणाची वर्णी याकडे लागून राहिले आहे.या निवडणूकीत काका गटाचे नगराध्यक्ष व १३ नगरसेवक असे अधिकचे संख्याबळ आहे.त्यामुळे काका गटातीलच उपनगराध्यक्ष होणार हे निश्चित आहे.काका गटातून उपनगराध्यक्षपदासाठी संजयकाकांची कोणाला पसंती राहणार,कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.मात्र,प्रभाग सातमधून काका गटाचे प्रसाद पैलवान हे मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाले आहेत.या प्रभागात अनेक वर्षापासून पैलवान यांनी काम केले असून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
त्यांच्या याच कामाची पोच पावती उपनगराध्यक्षपदाची संधी देऊन मिळण्याची शक्यता आहे. उपनराध्यक्षपदासाठी संजयकाका पाटील व प्रभाकरबाबा पाटील यांची त्यांच्या नावाला पसंती राहिल,असे दिसून येत आहे.नेमके चित्र उद्या स्पष्ट होईल.


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या