प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : निमणी येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून गोधन पालकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी मेळाव्याच्या ठिकाणी विधिवत होम हवन करण्यात आले.उपस्थित गोमातांचे पूजन करून ओटी भरण्यात आली.राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.स्वागत व प्रास्ताविक निमणीचे माजी उपसरपंच आर डी पाटील यांनी केले.यावेळी बोलताना प्रभाकर पाटील म्हणाले आज घरोघरी कॅन्सर,मधुमेह आणि रक्तदाबासारखे गंभीर आजार वाढले आहेत.देशी गाईच्या दुधात असणारे घटक हे मानवी आरोग्यासाठी अमृततुल्य आहेत.येणाऱ्या पिढीला सुदृढ बनवायचे असेल,तर पुन्हा एकदा घराघरात देशी गाईच्या दुधाचा वापर सुरू झाला पाहिजे."
केवळ सणावाराला गाईची पूजा न करता,प्रत्येकाने आपल्या गोठ्यात किमान एक तरी देशी गाय पाळली पाहिजे,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले."गायीच्या पाठीवरील वशिंडातून मिळणारी ऊर्जा आणि तिच्या सहवासातील सकारात्मकता विज्ञानानेही सिद्ध केली आहे.त्यामुळे गोपालन हा केवळ व्यवसाय नसून ती एक सेवा आणि काळाची गरज आहे,"असेही त्यांनी स्पष्ट केले.निमणी गावामध्ये विविध उपयुक्त असे उपक्रम सातत्याने राबविले जातात,या पुढच्या काळामध्ये मतदार संघातील प्रत्येक गावामध्ये असा उपक्रम आयोजित करणे बाबत पुढाकार घेऊ.यावेळी बोलताना पुष्कर चितळे म्हणाले आज आयोजित केलेला गोमाता मेळावा हा मेळावा नसून तो एक सोहळा आहे तो भारतीय संस्कृतीचा आणि परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे हा सोहळा आपल्याला गाईंचे महत्त्व शिकवतो आणि तिच्या संरक्षणासाठी प्रेरित करतो.तरुणांनी एकत्र येऊन देशी गोमातेचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा ध्यास घ्यावा व आजीवन गोसेवेचे व्रत घ्यावे.निमणी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी व गावातील शेतकरी तरुणांनी एक आदर्श उपक्रम सुरू केला असून भविष्यात त्याला आणखी चांगले स्वरूप देण्यासाठी लागेल ती मदत करू अशी ग्वाहीही त्यांनी दिली.डॉक्टर गणेश गांधले यांनी गाईचे दूध, तुप,शेण आणि गाईंचा सहवास किती आरोग्यदायी आहे व अनेक रोगांपासून मुक्ती मिळण्यासाठी त्याची उपयुक्तता अनेक उदाहरणे देऊन सांगितली.मेळाव्यात सहभागी झालेल्या सर्व गोधन पालकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भेटवस्तू औषधे व प्रमाणपत्र देण्यात आले.या कार्यक्रमाला निमणीच्या सरपंच सौ रेखा रविंद्र पाटील,उपसरपंच राजेंद्र घोडके,डॉ.जयश्री गांधले,विकास सोसायटीचे चेअरमन विलासराव पाटील,शरद पाटील,बाळासाहेब पाटील,द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक जालिंदर मस्के,पोपटराव पाटील,रंगाआप्पा गायकवाड, आप्पासाहेब पाटील,शिवाजी जाधव, एस ए पाटील, शिवाजी शिंदे,ए के पाटील,चंद्रकांत पाटील,सचिन जाधव,सुरेश माने,डॉ.दिपक पाटील,विनय सपकाळ,नामदेव जमदाडे,ज्ञानेश्वर पाटील,पशुधन पर्यवेक्षक पवन जाधव,अक्षय घाटगे, शितल शिंदे,डॉ.इंगळे,डॉ.कुलकर्णी यांच्यासह परिसरातील शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि गो-प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या