प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:नेहरूनगर येथील नंदीवाले समाजासह अनुसूचित जाती व इतर समाजातील ग्रामस्थांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी तसेच त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी यापुढेही कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही माजी खासदार संजयकाका पाटील यांनी दिली.चोरोची (ता. कवठेमहांकाळ) येथे नंदीवाले समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री लक्ष्मी माता मंदिर कलशारोहण सोहळ्यास माजी खासदार संजयकाका पाटील यांनी उपस्थिती लावली.यावेळी नंदीवाले समाजाच्या वतीने फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. संजयकाका पाटील यांनी श्री लक्ष्मी मातेचे भक्तिभावाने दर्शन घेत समाधान व्यक्त केले. संयोजकांच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना संजयकाका पाटील म्हणाले, “नेहरूनगरमधील नंदीवाले,अनुसूचित जाती तसेच इतर समाजातील ग्रामस्थांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.वनविभागाच्या जमिनीवर गेल्या पन्नास वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या ग्रामस्थांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा यापुढेही सुरू ठेवणार आहे.”या कार्यक्रमास निमणीचे माजी उपसरपंच तथा भारती शुगर्स,नागेवाडी व भारती एनर्जी, तासगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. डी. पाटील, बालाजी पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र भोसले,बाळासाहेब पाटील, वसंत भोसले,माणिक देशमुख, रामलिंग मोकाशी,दिलीप भोसले, रामजी देशमुख,सचिन देशमुख, शिवाजी मोकाशी,अरुण मोकाशी, दीपक भोसले,सुभाष भोसले, भास्कर देशमुख,विजय मोकाशी, अंकुश भोसले,शशिकांत भोसले यांच्यासह नंदीवाले समाज बांधव, माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या