सांगली प्रतिनिधी : बुधवार, दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता गणेश मंगल कार्यालय, मारुती चौक, सांगली येथे आमदार सदाभाऊ खोत यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीतून “डीजे संस्कृती संपूया, पारंपरिक संस्कृती जपूया” हा संकल्प पुढे नेण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचा, लोककलेचा आणि लोकसंगीताचा उत्सव ठरावा, यासाठी सांगलीतून हा संकल्प करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध वाद्यसंस्कृतीला आणि लोककलांना प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले असून, डीजेच्या कर्णकर्कश आवाजाऐवजी ढोल-ताशा, हलगी, संबळ, बेंजो, भजन, कीर्तन, वारकरी परंपरा, शाहिरी आणि पारंपरिक वाद्यांना व्यासपीठ मिळावे, अशी मागणी व्यक्त झाली आहे.
मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी पारंपरिक कला व वाद्यसंस्कृतीला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे. त्याच भूमिकेला प्रतिसाद देत सांगलीतील कलाकार, गणेश मंडळांचे पदाधिकारी, युवा कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून “डीजे संस्कृतीला पर्याय म्हणून महाराष्ट्राची पारंपरिक संस्कृती” हा विचार पुढे नेण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या