प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली : भारत विकास परिषद, सांगली शाखेतर्फे आयोजित समूहगीत गायन स्पर्धेत पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या इयत्ता सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या समूहगीत गटाने प्रथम क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादन केले. ही स्पर्धा टिळक स्मारक मंदिर, सांगली येथे उत्साहात पार पडली. या उल्लेखनीय यशामुळे पोदार स्कूलच्या समूहगीत गटाची आता पुणे येथे होणाऱ्या प्रांत फेरीसाठी निवड झाली आहे.
भारत विकास परिषदेच्या समूहगीत स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे ‘राष्ट्रीय चेतना के स्वर’ या पुस्तकातील एका हिंदी आणि एका संस्कृत गीताला स्पर्धकांनी स्वतःची नवीन चाल लावून ती रंगमंचावर प्रभावीपणे सादर करायची असते. संगीत, स्वर, ताल, शब्दोच्चार आणि सांघिक सादरीकरण यांचा सुंदर मिलाफ साधत पोदार स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिभेची चमक दाखवून प्रथम क्रमांक मिळविला.
या यशामागे शाळेचे म्युझिक विभाग प्रमुख श्री. प्रशांत भाटे आणि तबला शिक्षक श्री. मयूर जोशी यांचे मोलाचे मार्गदर्शन व परिश्रम लाभले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. जी. बी. पाटील आणि उपमुख्याध्यापिका सौ. विद्या आवटे यांचे मार्गदर्शन व सहकार्य विद्यार्थ्यांना मिळाले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन, शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थ्यांकडून अभिनंदन करण्यात येत असून, पुणे येथे होणाऱ्या प्रांत फेरीसाठी पोदार स्कूलचा संघ सज्ज झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या