प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : गणेशोत्सवामध्ये तासगाव शहरामध्ये घराघरात श्री गणेशाची भक्तिभावाने आरास केली जाते, याच गोष्टीला व्यापक स्वरूप देण्यासाठी बॉक्सर ग्रुप मित्रपरिवार आणि स्वामिनी वुमेन्स् फाऊंडेशनच्या वतीने " घरगुती गौरी-गणपती सजावट आरास स्पर्धेचे आयोजन काण्यात आले आहे, यावर्षी स्पर्धेचे ७ वे वर्ष असुन, प्रवेश नावनोंदणी मोफत आहे ,तरी ईच्छुक स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी दि.16 सप्टेंबर पुर्वी करावी असे आवाहन मा.उपनगराध्यक्षा तसेच विदयमान सभापती सार्वजनिक बांधकाम सौ.दिपालीताई दिग्विजय पाटील व मा.नगरसेवक दिग्विजय भैया पाटील यांनी केले आहे .
ही स्पर्धा वरचे गल्ली आणि तासगाव शहर या दोन विभागात प्रत्येक 3/3 विजेते निवडले जाणार आहेत, स्पर्धा परीक्षण समिती दि. 17 आणि 18 सप्टेंबर रोजी स्पर्धकाच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन सजावटीची पाहणी करणार आहे , स्पर्धकांनी आपली नावनोंदणी मोबा 70213 70441 या क्रमांकावर करावी ,विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह , प्रमाणपत्र आणि आकर्षक भेटवस्तु देण्यात येणार आहे. सर्व सहभागी स्पर्धकांनाही एक भेटवस्तु देण्यात येणार आहे अधिकाधिक स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन मंडळातफे करण्यात आले आहे .
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या