प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि. 3 : सांगली पाटबंधारे विभागांतर्गत जत तालुक्यातील सर्व लघु पाटबंधारे तलावांवर पुढील आदेशापर्यंत उपसाबंदी लागू करण्यात आल्याची माहिती सांगली पाटबंधारे विभागाने पत्रकाव्दारे दिली आहे. उपसाबंदी लागू करण्यात आलेल्या तलांवामध्ये जत तालुक्यातील कोसारी, तिप्पेहळ्ळी, वाळेखिंडी, सिध्दनाथ, रेवनाळ, बिरनाळ, शेगाव, तिकोंडी नं. 1, जालिहाळ, येळवी, सोरडी, प्रतापपूर, सनमडी, भिवर्गी, शेगांव क्र. 2, दरिबडची, पांडोझरी, अंकलगी, मिरवाड, गुगवाड, डफळापूर, बिळूर (केसराळ), उमराणी, खोजनवाडी, बेळूंखी आणि दोड्डानाला या 26 लघु पाटबंधारे तलावांचा समावेश आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या