सांगली दि.८ : विविध कारणांमुळे नागरिकांची शासकीय कार्यालयाकडील अडकलेली व नवीन कामे मार्गी लावण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यात भाजपा सेवा अभियानांतर्गत मंगळवार दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी स. ११ ते दु. २ या वेळेत हाॅटेल ककून आमराई रोड येथे मा. संतोषजी साखरे हे भाजपा प्रदेशाध्यक्ष आर. रविंदजी चव्हाण यांना अग्रेषित केलेली नागरिकांची प्रलंबित/नवीन शासकीय कामाची निवेदनं समक्ष स्वीकारणार आहेत. तरी संबंधित नागरिकांनी आपली निवेदनं देऊन सेवा अभियानाचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा नेते व या उपक्रमांतर्गत सांगली जिल्हा दौरा समन्वयक पृथ्वीराजबाबा पाटील,ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक व शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी केले आहे.
निवेदनं प्राप्त होताच दुसऱ्या दिवशी संबंधित शासकीय कार्यालयाकडे प्रलंबित/नवीन कामाचा पाठपुरावा करुन कामे मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार असल्याने कामे वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल व नागरिकांची कामे मार्गी लावण्यासाठी हे भाजपाचे अभियान सुरु आहे अशी माहिती त्यांनी दिली. शासकीय कामाशी संबंधित नागरिकांनी या भाजपा सेवा अभियानाचा लाभ घ्यावा असे पृथ्वीराजबाबा पाटील यांनी जाहीर आवाहन केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या