सांगली, दि. ८ : वर्ल्ड बायसिकल डे २०२६ निमित्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सांगली तथा जिल्हा क्रीडा परिषद, सांगली यांच्या वतीने संडेज ऑन सायकल (Sundays on Cycle) या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या उपक्रमाअंतर्गत ७ जून २०२६ रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सांगली यांच्या वतीने भोकरे कॉलेज गेट ते विश्रामबाग चौक पोलीस अधीक्षक कार्यालय, सांगली या मार्गावर सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व त्यांच्या समूहाने सहभाग घेतला.
सायकल रॅलीत सांगली पोलिसांसह विविध वयोगटातील खेळाडू, नागरिक, विविध क्रीडा संघटना, शाळा-महाविद्यालये, सायकल असोसिएशन सांगली तसेच वयोवृद्ध सायकलप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. उपक्रमात एकूण १८९ जणांनी सहभाग घेतला.
संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध, सुरक्षित व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सांगली यांच्या वतीने सर्व कर्मचारी तसेच सायकलिंग क्लबचे दत्ता पाटील व अनिल माने यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याशिवाय वाहतूक शाखा, वैद्यकीय पथक आणि सर्व सहभागी यांचेही विशेष योगदान राहिले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी सर्वांचे आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या