सांगली प्रतिनिधी : अनित्य प्रकाशन व वारकरी प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष साहित्यिक विजयकुमार भोईर, प्रमुख पाहुणे साहित्यिक भारत सातपुते, साहित्यिक नवनाथ रणखांबे, संपादिका सुप्रिया जाधव, अनित्य प्रकाशनाचे जगदेव भटू, वारकरी प्रकाशनाचे राहुल मुंडे आदी.मान्यवरांच्या उपस्थित स्काऊट ग्राउंड सदाशिव पेठ पुणे येथे नुकताच संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध कवी जीवनसंघर्षकार फेम नवनाथ आनंदा रणखांबे यांना त्यांच्या साहित्य क्षेत्रातील भरीव कामगिरी बद्दल राज्यस्तरीय महाराष्ट्र साहित्य भूषण पुरस्काराने साहित्यिक विजयकुमार भोईर, साहित्यिक भारत सातपुते, अनित्य प्रकाशाचे प्रकाशक जगदेव भटू यांच्या हस्ते अनित्य प्रकाशनाच्या वतीने गौरवण्यात आले. नवनाथ रणखांबे हे विविध आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय ऐतिहासिक बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड धारक असून आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय , राज्यस्तीय विविध पुरस्काराने ते सन्मानित आहे. साहित्य क्षेत्रात ते जीवनसंघर्षकार म्हणून प्रसिद्ध आहे. यावेळी विजयकुमार भोईर राज्यस्तरीय महाराष्ट्र साहित्य भूषण पुरस्कार , श्रीकृष्ण टोबरे राज्यस्तरीय जागल्या पुरस्कार, सुरेखा गायकवाड राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार इत्यादी. पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड उमाकांत आदमाने केले.
महाराष्ट्र साहित्य भूषण राज्यस्तरीय पुरस्काराने नवनाथ रणखांबे सन्मानित
By -
एप्रिल ०३, २०२६
0
प्रतिष्ठा न्यूज
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या