सांगली प्रतिनिधी : हिंदू एकता आंदोलन सांगली जिल्हा व सकल हिंदू समाज सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने खाणभाग, नळभाग, राजवाडा, फौजदार गल्ली परिसरातील हिंदू धर्मीय चे विराट हिंदू धर्म संमेलन चिंतामणराव पटवर्धन हायस्कूलच्या प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक कृष्णा पांडुरंग जाधव हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात भगवा ध्वजाचे रोहन आमदार सुधीर दादा गाडगीळ व माजी आमदार नितीन शिंदे यांचे हस्ते करून, दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली.
*यावेळी स्वागत व प्रस्ताविक करताना हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की,* रा. स्व. संघाच्या शताब्दी वर्षामध्ये देशातल्या हिंदूंना एकत्रित करण्यासाठी संपूर्ण देशभर हिंदू धर्म संमेलनाचे आयोजन केलेला आहे. या हिंदू धर्म संमेलनाच्या माध्यमातून हिंदूंना हिंदूंचे धर्मशिक्षण, हिंदूंचे धर्माचरण व हिंदूंच्या वर आलेली धर्म संकटाची माहिती देऊन झोपलेल्या हिंदूंना जाग करण्याचे काम या विराट हिंदू धर्म संमेलनाच्या माध्यमातून करत आहेत.
*यावेळी बोलताना सौ कल्याणीताई गाडगीळ म्हणाल्या की,* सर्व हिंदूंनी आपल्या मुलांना आपल्या हिंदू धर्माबद्दल शिक्षण दिलं पाहिजे. हिंदू महिलांनी आपल्या भागातील येणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांशी प्रेमानं बोलून त्यांना राखी बांधा.
*यावेळी बोलताना रा. स्व. संघाचे जिल्हा कार्यवाह नितीनजी देशमाने म्हणाले की,* राष्ट्रीय स्वयंमसेवक संघ देव देश धर्मासाठी कार्य करणारी संघटना असून कोरोना सारख्या संकट काळात गुजरातच्या भूकंपाच्या वेळी, भारत चीन लढाईच्या दरम्यान तसेच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी उभारलेल्या स्वातंत्र्यलढ्यात स्वयंसेवकांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
*यावेळी बोलताना अँड. गुरुराज रसाळ म्हणाले की,* लव जिहाद, लँड जहाज, धर्मांतरण यांच्या विरोधात नुसते कायदे करून चालणार नाही यासाठी हिंदूनी एकत्र आल पाहिजे.
*या हिंदू धर्म संमेलनात बोलताना निळकंठ शिवयोगी धारेश्वर महाराज म्हणाले की,* हिंदूंनी जातीपातीच्या भिंती पाडून हिंदू धर्मासाठी एकत्र आल पाहिजे हिंदू धर्मीयांच्या उत्सवामध्ये भाग घेतला पाहिजे. हिंदूंनी हिंदू म्हणून धर्माच आचरण केलं पाहिजे.
या हिंदू धर्म संमेलनास श्रीकांत तात्या शिंदे, बाळासाहेब मोहिते अँड. माधवराव कुलकर्णी, शंतनू लिमये, राजू मोहिते, पै. प्रदीप निकम राजू जाधव, अनिरुद्ध कुंभार, अवधूत जाधव, गजानन माने, श्रीधर मेस्त्री, निखिल सावंत, सुमित शिंगे, दिग्विजय शिंदे, हारपितसिंग गौड, रवींद्र वादवणे, भूषण गुरव, प्रथमेश खिलारे आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या